Ayodhya Flight Tickets: येत्या 22 तारखेला अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पणाचा सोहळा संपन्न होणार आहे. या भव्य दिव्य सोहळ्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून देशात सर्वत्र केलेली पाहायला मिळते, तसेच हा लोकार्पण सोहळा अनेक दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. कित्येक महिन्यांपासून चर्चेचा विषय बनलेल्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा विमान प्रवास मात्र अत्यंत महागलाय. अयोध्येचा या वर्षात सर्वतोपरी जीर्णोद्धार झालेला आहे, यात केवळ राम मंदिरात नाही तर अयोध्येतील नवीन विमानतळ आणि पुनर निर्माण केलेल्या रेल्वे स्टेशन जाहीर समावेश होतो. अयोध्येचे हे बदललेले रूप आणि श्रीरामांना पुन्हा एकदा सिंहासनावर विराजमान झालेलं पाहण्यासाठी अनेकांची रांग लागली आहे. तीर्थक्षेत्र म्हणून कायमच प्रसिद्ध असलेल्या अयोध्या नगरीत आता केवळ भक्तांचीच नाही तर पर्यटकांची सुद्धा गर्दी वाढताना दिसते व याच्याच परिणामी एखाद्या परदेशी प्रवासापेक्षा सुद्धा अयोध्येचा प्रवास महाग झालेला जाणवतोय.
अयोध्येचा विमान प्रवास महागला:(Ayodhya Flight Tickets)
फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालानुसार 22 जानेवारी रोजी होणाऱ्या मंदिर लोकार्पण सोहळ्याआधीच देशात अनेक पर्यटक जमा होत आहेत, आणि लोकांच्या वाढलेल्या मागणीमुळेच विमान प्रवास महाग झालाय. सादर झालेल्या अहवालात अशी ही माहिती पाहायला मिळते की 19 जानेवारी 2024 रोजी मुंबईतून अयोध्येला उड्डाण घेण्याऱ्या इंडिगो विमानाची किंमत 20,700 रुपये असू शकते, तसेच 20 जानेवारी 2024 रोजी सुद्धा या विमानाची किंमत 20,000 हजाराच्या आसपास असलेली पाहायला मिळत आहे.
मात्र याच्याच विरुद्ध जर आपण एखादा परदेशी प्रवास तपासून पाहिला यात बरीच तफावत दिसून येईल, कारण 19 जानेवारी 2024 रोजी होणारा मुंबई आणि सिंगापूरचा प्रवास एअर इंडिया ही प्रसिद्ध विमानसेवा केवळ 10,987 रुपयात करून देणार आहे. तसेच मुंबई आणि बँकॉकचा प्रवास हा सुद्धा डायरेक्ट विमानाने केल्यास 13,800 रुपयात पूर्ण होऊ शकतो. हे आकडे पाहता अयोध्येतील विमान प्रवास हा कुठल्याही परदेशी विमान प्रवासापेक्षा महागलेला दिसून येतोय(Ayodhya Flight Tickets). हे मागणी जर का अशीच वाढत गेली तर विमान कंपन्या तिकिटांच्या किमती कमी करण्याचा विचार करणार नाहीत, कारण बाजारी गणिताच्या आधारे जेवढी मागणी जास्त होते, तेवढीच सेवांची किंमतही वाढत जाते.
अयोध्येचा बिझनेस इक्विटीत आली आहे तेजी:
अजून मंदिराचा उद्घाटन व्हायला काही दिवस बाकी आहेत, आणि उद्घाटनापूर्वीच अयोध्येतील अनेक प्रकारच्या बिजनेस इक्विटी मध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. मंदिर लोकार्पण सोहळ्या दरम्यान आणि त्याआधी इथल्या बाजाराला भरपूर मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. OYO या हॉस्पिटलिटी कंपनीचे फाउंडर रितेश अग्रवाल म्हणतात की, “मंदिर लोकार्पण सोहळ्या प्रित्यर्थ अयोध्येत अनेक हॉटेल्स उघडली जात आहेत”. त्यामुळे अयोध्येची वाढती मागणी पाहता लवकरच हे केवळ एक श्रद्धास्थान नसून पर्यटन स्थळ देखील बनण्याचे अपेक्षा आहे.
काही दिवसांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील नवीन विमानतळाचे उद्घाटन केले होते. या विमानतळाला रामायणाचे रचते महर्षी वाल्मिकी यांचे नाव देण्यात आले आहे. उद्घाटनानंतर एअर इंडिया एक्सप्रेस आणि इंडिगो या विमानसेवांचा हवाई प्रवास अयोध्येच्या दिशेने सुरू झाला आहे(Ayodhya Flight Tickets). मात्र जसजसा मंदिर लोकार्पण सोहळा जवळ येतोय, या कंपन्यांचा विमान प्रवास देखील महाग होत जाण्याची शक्यता आहे.