Ayodhya Flights : अयोध्येचा विमानप्रवास झालाय स्वस्त, ‘या’ कंपन्या देतील हवाई सफारीचा आनंद

Ayodhya Flights : काल अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे, त्यामुळे आता लवकरच सर्व भक्तांना मंदिरात जाऊन श्रीरामांशी भेट घेता येणार आहे. अयोध्येत झालेल्या या अभूतपूर्व सोहळ्याला देशभरातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरम्यान श्रीरामांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा केली आणि गेल्या अनेक वर्षांपासून अडकून राहिलेलं कित्येक जणांचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. सर्व भाविकांसाठी आज म्हणजेच 23 जानेवारीपासून मंदिराचे दरवाजे खुले होतील त्यामुळे जर का तुम्ही रामललांच्या दर्शनासाठी उत्सुक असाल तर विमान कंपन्यांकडून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

अयोध्येचा विमान प्रवास स्वस्त झाला का? (Ayodhya Flights)

सर्व भाविकांसाठी भारतीय विमान कंपन्यांकडून एक आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली आहे. मंदिर दर्शनासाठी तुम्ही जर का 10 दिवस वाट बघण्याची तयारी दाखवली तर तुमचा विमान प्रवास हा 70% कमी होऊ शकतो. सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार लोकार्पण सोहळ्यापासून पासून 10 दिवसांनी विमानाची तिकीट बुक केल्यास तुम्ही 70% पेक्षा कमी दराने विमानप्रवास करू शकणार आहात. आताच्या घडीला अयोध्या आणि श्रीराम हा सर्वात चर्चेचा विषय असल्यामुळे सर्वत्र याचा बोलबाला वाढलाय आणि व्यावसायिक अधिकाधिक पैसे कमावण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे विमानाच्या तिकिटांच्या किमती देखील अनेक पटींनी वाढल्या आहेत. आत्तासाठी राम मंदिराचा प्रवास करायचा असल्यास तुम्हाला किमान 10 ते 15 हजार रुपये मोजावे लागू शकतात.

मात्र जर का तुम्ही आतापासून 10 दिवसानंतर अयोध्याच्या प्रवासाचा विचार करणार असाल तर हेच तिकीट 3 ते 4 हजारांच्या किमतींवर उपलब्ध होऊ शकते, याचा अर्थ असा की तुम्ही 3 फेब्रुवारी पासून हवाई प्रवासाचा विचार करावा(Ayodhya Flights). अयोध्येचा विमान प्रवास करण्यासाठी तुम्हाला कोणत्या विमान कंपन्या मदत करतील? इंडिगो(Indigo), एअर इंडिया एक्सप्रेस(Air India Express) यांची तिकिटं बाकी कंपनीच्या तुलनेत जराशी महाग असतील , म्हणूनच जर का तुम्हाला विमान प्रवास करायचा असेल तर वेळत तिकिटं बुक करा किंवा तुम्ही स्पाइस जेट(SpiceJet) या विमानसेवेचा वापर करून अयोध्येचा प्रवास करू शकता, कारण सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार 4 फेब्रुवारीपासून स्पाइस जेट(SpiceJet) ही विमान कंपनी 3 हजार रुपयात तिकीटं उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे.