Ayodhya Mandir Inauguration : आज तो दिवस आलाच ज्याची प्रत्येकाला गेल्या अनेक वर्षांपासून आस लागून होती. श्रीराम पुन्हा आपल्या नगरीत परतायला काही क्षणांचा अवधी बाकी आहे. या अभूतपूर्व सोहळ्याला केवळ अयोध्या नगरीच नाही तर संपूर्ण भारत नटून थाटून तयार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का, अयोध्यात येताना श्रीराम सोबत पैश्यांचा खजिना घेऊन येणार आहेत. कसे? आज जाणून घेऊया.
श्रीराम घेऊन येणार भरगोस खजिना : (Ayodhya Mandir Inauguration)
आज अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे, देश विदेशातून अनेक लोकांच्या नजरा आज अयोध्येकडे लागल्या आहेत. देशातील प्रत्येक माणसाला श्रीरामांना अयोध्येच्या भव्य मंदिरात विराजमान झालेलं बघण्याची इच्छा आहे. मात्र श्रीराम केवळ भक्तीशी नाही तर अर्थव्यवस्थेशी सुद्धा जोडले गेले आहेत. राम मंदिर निर्माणामुळे उत्तर प्रदेश सरकारला भरपूर फायदा होणार आहे.
तुम्ही आजूबाजूला फुलं, पताका, माळा, श्रीरामांचे फोटो आणि इतर गोष्टींची विक्री होताना पहिलीच असेल. विचार करा जर का अयोध्येपासून कैक दूर असल्येला आपल्या बाजारांमध्ये एवढी मोठी विक्री होत असेल तर अयोध्येच्या बाजाराची परिस्थती नेमकी कशी असणार असेल. अयोध्येत शिवाय टेन्ट आणि मिठाईवाले भरपूर पैसे कमावणार आहेत. Confederation of all India Traders यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरामुळे बाजारला जवळपास 1 लाख कोटी रुपयांपर्यंत फायदा झाला आहे. आज देशभरात सर्व बाजार सुरु असणार आहेत म्हणूनच गल्ली ते दिल्ली सर्व व्यापारांना आज जलद गतीने चालना मिळत आहे . राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा हा देशभरात दिवाळवीप्रमाणे साजरा केला जातोय, म्हणूनच आज बाजारात मातीचे दिवे आणि इतर रोषणाईच्या साधनांची भरगोस विक्री होणार आहे. याचप्रामणे श्रीरामांचे फोटो असलेले T-shirt, कुर्ता, टोप्या आणि फाटकयांना भारी मागणी मिळत आहे. आज संपूर्ण देशभरातील बाजारांमध्ये 20 हजारांपेक्षा जास्ती कार्यक्रम होणार आहेत.
उत्तर प्रदेश सरकारचा खजिना भरला:
अयोध्येत उभ्या राहिलेल्या मंदिरामुळे उत्तर प्रदेशात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. ट्यूरिझम क्षेत्राचा विस्तार झाल्याने उत्तर प्रदेश सरकारच्या तिजोरीत अधिकाधिक पैसे जमा होणार आहे. बाजारी तज्ञांच्या मतानुसार वर्ष 2025 पर्यंत उत्तर प्रदेश सरकारला 20 ते 25 कोटी रुपयांचा अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. राममंदिर सर्वांसाठी खुलं झाल्यानंतर उत्तर प्रदेश मध्ये ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे, म्हणूनच टुरिंग स्टायपींड म्हणजेच पर्यटकांकडून केला जाणारा खर्च देखील वाढेल(Ayodhya Mandir Inauguration), आणि अंदाजानुसार वर्ष 2022 मध्ये 2.2 लाख कोटी रुपये असलेला हा खर्च आता ४ लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे, विदेशी पर्यटकांनी 2022 मध्ये जावपळपास इथे 10 हजार कोटी रुपयांचा खर्च केला होता आता हा आकडा कितपत वाढतोय हे पाहणं रंजक ठरणार आहे.