Ayodhya Projects Inauguration : भारतात आत्ताच्या घडीला सुरू असलेलं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजेच राम मंदिर निर्माण होय. गेल्या अनेक वर्षांपासून अडकून पडलेल्या या मंदिर निर्माणचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आल्यानंतर आता अयोध्येत जोमाने श्रीराम मंदिराच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे उदघाटन होणार आहे . अलीकडेच प्रकाशित झालेल्या बातमीनुसार अयोध्येत होणारी ही मंदिर निर्मिती भारतात जवळपास 50 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय उभा करणार आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का की आज 30 डिसेंबर रोजी राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी भारतात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. यामध्ये खास करून अमृत भारत एक्सप्रेस या नवीन ट्रेनचा समावेश असणार आहे. प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करत असलेल्या भारतात नेमके कोणते बदल घडत आहेत याकडे एक लक्ष फिरूवूया…
मंदिर लोकार्पणाआधी घडणार हे महत्त्वाचे बदल: (Ayodhya Projects Inauguration)
अयोध्या मंदिर निर्माण भारतीयांच्या दृष्टीने देशातील अनेक ऐतिहासिक क्षणांपैकी एक आहे. मात्र अयोध्या श्रीरामांचे प्राणप्रतिष्ठा होण्याआधीच 30 डिसेंबर 2023 रोजी वर्षाच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काही महत्त्वाच्या निर्णयांना हिरवा झेंडा दाखवला जाईल. यात अयोध्येमध्ये सुरुवात करण्यात येणाऱ्या काही प्रकल्पांचा समावेश आहे, ज्यात नवीन विमानतळाचे होणारे उद्घाटन हे कुठल्या सोहळ्यापेक्षा कमी असणार नाही. याशिवाय अयोध्या मधून सीता मातेच्या जन्मभूमीपर्यंत अमृतभारत ही नवीन ट्रेन धाव घेणारा आहे (Ayodhya Projects Inauguration), या महत्त्वाच्या क्षणी वंदे भारतच्या काही ट्रेनना रेल्वेच्या रुळावरून धावण्याची संधी मिळणार आहे.
कसा असेल संपूर्ण कार्यक्रम –
सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11:15 वाजता पुनर्निर्माण निर्माण करण्यात आलेल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करतील जिथून दोन नवीन अमृतभारत एक्सप्रेस आणि सहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस यांना हिरवा झेंडा दाखवला जाईल. याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्येमधील काही महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले जाईल. अयोध्येत नवनिर्माण करण्यात आलेल्या या रेल्वे स्टेशनला आता अयोध्या धाम जंक्शन असे नवीन नाव देण्यात आले आहे. या नवीन रेल्वे स्टेशनवर आता लिफ्ट, अस्कलेटर, फूड प्लाझा, चाइल्ड केअर रूम, वेटिंग हॉल अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच दरम्यान सहान नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन्सचे उद्घाटन केले जाईल. या विविध ट्रेन्समध्ये श्री माता वैष्णव देवी कटरा-दिल्ली, अयोध्या-आनंद विहार टर्मिनल वंदे भारत, अमृतसर दिल्ली-वंदे भारत, कोयंबतूर-बेंगलोर केंट वंदे भारत, मेंगलोर-मडगाव वंदे भारत तसेच जालना-मुंबई वंदे भारत या ट्रेन्सचा समावेश असणार आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी या दरम्यान 23 हजार कोटी रुपये गुंतवलेल्या बाकी रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरच्या वस्तू देशाला समर्पित करतील.
अयोध्येत होणार नवीन विमानतळाचे उद्घाटन:
30 डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या या विविध उद्घाटन सोहळ्यांमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे तो म्हणजे अयोध्येमधील नवीन विमानतळाचे उद्घाटन. दुपारी 12:15 वाजता अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन नेवल एअरपोर्टचे उद्घाटन केले जाईल. या एअरपोर्टच्या निर्मितीमध्ये एकूण 1450 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून. या विमानतळाजवळ एकूण दहा लाख पर्यटकांची जबाबदारी पेलण्याची क्षमता प्राप्त आहे (Ayodhya Projects Inauguration).
या विमानतळावरील सगळ्यात समोरचा भाग म्हणजेच टर्मिनल बिल्डिंग सध्या सुरू असलेल्या राम मंदिर निर्माण याची वास्तूकला दर्शवते. टर्मिनल बिल्डिंगच्या आत प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील विविध प्रसंग चित्रांच्या माध्यमातून दर्शवले गेले आहेत .अयोध्या विमानतळाची टर्मिनल इमारत उष्णतारोधक छप्पर, ईडी लाइटिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, लँडस्केपिंग, कारंजे असलेले वायर ट्रीटमेंट प्लांट, सीवेज ट्रीटमेंट प्लांट, सोलर पॉवर प्लांट यासह अनेक सुविधांनी सुसज्ज आहे. अयोध्या विमानतळामुळे, परिसरातील कनेक्टिव्हिटी सुधारेल, ज्यामुळे पर्यटन, व्यावसायिक क्रियाकलाप आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल. इथे 30 डिसेंबरपासूनच इंडिगो या विमानसेवेकडून अहमदाबाद ते अयोध्या आणि दिल्ली ते अयोध्या विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.