Ayodhya Ram Mandir: राम मंदिराला 11 दिवसांत 11 कोटी रुपयांची देणगी; पैसे मोजण्यासाठी 14 लोकांची टीम

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे आणि त्यासोबतच देणग्यांमध्येही लक्षणीय वाढ होत आहे. 22 जानेवारी 2024 रोजी मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून मोठ्या संख्येने लोक प्रभू रामाच्या दर्शनासाठी अयोध्येला येत आहेत आणि याचसोबत ते मंदिराला देणगीही देत आहेत. हे दर्शवते की राम मंदिर भाविकांच्या मनात किती महत्वाचे स्थान आहे आणि ते मंदिराच्या उभारणीसाठी किती उत्सुक आहेत.

मंदिरासाठी भक्तांची भरगोस देणगी: (Ayodhya Ram Mandir)

22 जानेवारीपासून भाविकांसाठी खुले झालेल्या राम मंदिराला केवळ 11 दिवसांत 11 कोटींहून अधिक रुपयांची देणगी मिळाली आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्रानुसार, या काळात सुमारे 25 लाख भाविकांनी मंदिराला भेट दिली असून, दानपेटीत 8 कोटी रुपये जमा झाले आहेत तर दुसऱ्याबाजूला 3.50 कोटी रुपये ऑनलाइन देणगी स्वरूपात प्राप्त झाले आहेत. या आकड्यांवरून लक्ष्यात येतं श्रीरामांप्रति भाविकांच्या मनात किती श्रद्धा आणि निष्ठा साठली आहे.

राम मंदिर ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांच्या माहितीनुसार, दररोज 2 लाखांहून अधिक भाविक राम मंदिराच्या दर्शनासाठी येत आहेत. मंदिराच्या गर्भगृहाजवळ दर्शन पथावर चार मोठ्या दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये भाविक पैसे देतात(Ayodhya Ram Mandir). या दानपेट्यांमधून जमा झालेले पैसे मोजण्यासाठी 14 लोकांची टीम तयार करण्यात आली आहे. यात 11 बँक कर्मचारी आणि मंदिर ट्रस्टच्या 3 कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. 4 लोकं प्रसादाची मोजणी करतात आणि CCTV कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली देणग्या मोजल्या जातात.