Ayodhya Ram Mandir : शेवटी देशातील शेकडो भक्तांचे स्वप्न पूर्ण होणार आहे, कारण 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रभू रामचंद्रांना 1 किलो सोन्याचे सिंहासन दिले जाणार आहे. पण कोण आहेत हे गृहस्थ जे श्री रामांना एवढे महाग सिंहासन देणार आहेत हे जाणून घेऊयात..
कोण देणार सोन्याचे सिंहासन? (Ayodhya Ram Mandir)
अयोध्येत श्री रामांची प्राणप्रतिष्ठा होणे हे अनेक जणांचे स्वप्न होते, जे कि कित्येक वर्षांच्या प्रयत्नानंतर साध्य होणार आहे. या दरम्यान आंध्र प्रदेशातील एक भक्त प्रभू श्री रामांना 1 किलो सोन्याचे सिंहासन देणार असून सी. श्रीनिवासन असे या गृहस्थांचे नाव आहे. या सोबतच ते 8 किलोंच्या चांदीच्या पादुकाही देवाच्या चरणी अर्पण करणार आहेत. इथेच हे गृहस्थ थांबत नाहीत तर ते या पादुकांसह 40 दिवस अयोध्येत विविध ठिकाणी पूजा केली होती.
पादुका आहेत खास :
सी श्रीनिवासन ज्या पादुका प्रभू रामचंद्रांना (Ayodhya Ram Mandir) अर्पण करणार आहेत या काही सध्या सुध्या पादुका नसून त्यात दहा बोटांच्या जागी रत्ने जडवलेली आहेत.दैनिक भास्करच्या वृत्तानुसार श्री रामांच्या अवताराला शोभेल अशी शंख, चक्र, गदा,कमळ अशी चिन्हे त्यावर कोरलेली आहेत. या पादुका अर्पण करण्याआधी गृहस्थांकडून त्यांची अयोध्येत विविध ठिकाणी पूजा करण्यात आली होती. तसेच अयोध्येपर्यंत येणाऱ्या 84 कोसी परिक्रमेच्या मार्गावर येणाऱ्या सर्व धार्मिक स्थळांवर यांची पूजा करण्यात आली आहे.