Ayodhya Ram Mandir Inauguration : राम मंदिर लोकार्पण सोहळ्याआधीच ‘या’ कंपन्यांचे शेअर्स वधारले

Ayodhya Ram Mandir Inauguration : 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतातील जनतेकडून ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली जायची तो दिवस आता जास्ती दूर नाही. अयोध्येत श्रीराम विराजमान होण्याआधीच संपूर्ण अयोध्येचे रूपांतर एका स्मार्ट सिटी मध्ये करण्यात आले आहे. अयोध्येत आता नवीन विमानतळ आणि सुधारित अवस्थेतील रेल्वे स्टेशन बनवले गेले आहे. सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार अनेक कंपन्या सध्या अयोध्येत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. श्रीराम मंदिराच्या निर्मितीमुळे इथे कार्यरत असणाऱ्या कंपनीच्या स्टॉक मध्ये तेजाने वाढ झालेली पाहायला मिळते. Ayodhya development Authority कडून व्यक्त केलेल्या अंदाजानुसार उद्घाटनानंतर इथे तीन ते पाच लाख लोकं श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी येतील आणि श्रीरामांच्या या असंख्य भक्तांमुळेच उपस्थित कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आलेली आहे.

राम मंदिरामुळे हॉस्पिटॅलिटी सेक्टर मध्ये तेजी: (Ayodhya Ram Mandir Inauguration)

केवळ अयोध्या नाही तर आजूबाजूच्या परिसरातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात मंदिराच्या निर्मितीमुळे कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. या धार्मिक पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या काळात यापेक्षाही अधिक व्यवसायांना फायदा मिळणार आहे. प्रवेज लिमिटेड या कंपनीच्या स्टॉक मध्ये गेल्या काही महिन्यात 70% पर्यंत तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीने अयोध्येत सध्या एक रिसॉर्टचे काम हाती घेतले होते, जे की 15 जानेवारीपासून ग्राहकांसाठी खुले होईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या रिसॉर्ट मध्ये 75% पर्यंत बुकिंग पूर्ण झाले आहेत.

इंडियन हॉटेल्स, EIH, ITC या कंपन्यांचा देखील राम मंदिर निर्मितीमुळे खप वाढला आहे. येणारा दिवसांमध्ये हा खप अधिकाधिक उंचावत जाणार असून इंडियन हॉटेल्स कडून इथे विवांता आणि जिंजर फ्रेंड हॉटेल्सची सुरुवात केली जाईल. सध्या हॉटेल्स मधून कमाई करणाऱ्यांची इथे दिवाळीच सुरू आहे. 19 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत 17 ते 73 हजार रुपये प्रति दिवसांप्रमाणे भाडे हॉटेल मालकांनी मिळवले होते. सध्या अयोध्येत 73 नवीन हॉटेल सुरू होणार आहे, ज्यांपैकी चाळीस हॉटेल्सचे निर्माण सुरू झालेले आहे.

हवाई सेवांना देखील मिळतोय दमदार प्रतिसाद:

अयोध्येत महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू झाल्यानंतर 10 जानेवारी पासून इथे विमानांची ये-जा सुरु झाली आहे. राम मंदिर आणि अयोध्या यांच्या वाढत्या आकर्षणामुळे विमान कंपन्या सांगतील त्या दरात भक्त आणि पर्यटक किंमत मोजायला तयार आहेत. काही दिवसांमध्ये इंटर ग्लोब एव्हिएशन यांचे शेअर्स 3.7% तर स्पाइस जेट या कंपनीचे शेअर्स 2.05 टक्क्यांनी वाढले होते.

केवळ विमानसेवाच नाही तर रेल्वेला देखील श्रीरामांच्या येण्याने आनंदाची बातमी मिळाली आहे. IRCTC कडून राम मंदिर उद्घाटनाच्या दरम्यान 1000 ट्रेनच्या सुविधा दिल्या जाण्याचा घोषणा करण्यात आली आहे. यामुळे श्रीरामांचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या लोकांचा प्रवास सुलभ होईल. गेल्या काही दिवसात IRCTC चे स्टॉक 2.83 टक्क्यांनी वाढले असून, गेल्या काही महिन्यातच कंपनीच्या स्टॉक मध्ये 20.44 टक्क्यांची वाढ झाली होती (Ayodhya Ram Mandir Inauguration). श्रीरामांचे भक्त मिळेल त्या साधनांचा वापर करून त्यांची भेट घेण्यास उत्सुक आहेत. याच्याच परिणामी थॉमस कुक, इस माय ट्रिप, रेट गेम ट्रॅव्हल यांसारख्या कंपन्यांना दररोज बुकिंग साठी फोन कॉल येत आहेत. याचा अर्थ असा कि श्रीराम अयोध्येत विराजमान होण्याआधीच विमान सेवा, हॉटेल, कॅब, बस, रेल्वे अशा विविध कंपन्यांना अधिकाधिक फायदा मिळायला सुरुवात झाली आहे.