Ayushman Bharat Card Download : भारताच्या GDP मध्ये सकारात्मक वाढ होत असली तरीसुद्धा देशातील गरिबीचा आकडा अजून काही संपलेला नाही. देशातील अधिकांश जनसंख्या ही आजही मध्यमवर्गीय कुटुंबांचा भाग आहे. आजूबाजूला होणारे वातावरणातील बदल किंवा इतर घटकांमुळे पसरणारी रोगराई दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रत्येकालाच आपल्या कुटुंबाची काळजी वाटत असते. पण एखाद्या रोगाचा उपचार करणं म्हणजे बँकेतून भलं मोठं कर्ज काढत माणूस उधारीच्या जाळ्यात अडकत जातो. मात्र केंद्र सरकारकडून वेळोवेळी सामान्य जनतेला मदत करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात विविध योजना राबवून मदत पोहोचवली जाते. ज्यांपैकीच एक आहे आयुष्मान भारत कार्ड. काय आहे आयुष्मान भारत कार्ड आणि त्याचे फायदे जाणून घेऊयात….
काय आहे आयुष्यमान भारत कार्ड
आयुष्मान भारत कार्डचा वापर करून तुम्ही सरकारी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय सेवांचा लाभ मिळवू शकता. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आयुष्मान भारत योजना राबवली जाते. भारतातील सामान्य जनतेला मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना जगभरात सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणून ओळखली जात आहे. मोदी सरकारकडून 23 सप्टेंबर 2018 रोजी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात करण्यात आली होती. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत लाभार्थी वर्गाला आरोग्यसेवा मिळवण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. योजनेअंतर्गत मिळणारे आयुष्मान भारत कार्ड तुम्ही ऑनलाईन देखील डाउनलोड करू शकता.
आयुष्मान भारत कार्डसाठी पात्रता काय आहे?
देशभरात सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा आणि उपचार मिळवण्यासाठी आयुष्मान भारत कार्ड (Ayushman Bharat Card Download) हे सर्वात सोयीचं मानलं जातं. आणि घरबसल्या हे कार्ड डाऊनलोड करण्याची प्रक्रिया देखील अत्यंत सोपी आहे. मात्र तुम्ही यासाठी पात्र आहात कि नाही हे तपासण्यासाठी, तुम्हाला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल (https://pmjay.gov.in).
यानंतर तुम्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी “am I eligible” हा पर्याय निवडावा लागेल. पुढच्या टप्प्यात मोबाईल नंबर रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक OTP देण्यात येईल. ज्यानंतर तुम्हाला तुमचे राहते राज्य आणि जिल्हा निवडावा लागेल. पुढे तुमचे नाव, रेशन कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर तपासून पहा आणि यानंतर तुम्ही योजनेचा भाग बनण्यासाठी पात्र आहात की नाही याबद्दल माहिती दिली जाईल. शिवाय तुम्ही आयुष्मान भारत योजनेच्या कॉल सेंटरला फोन करून सदर माहिती मिळवू शकता. (1455/1800 11565)
आयुष्मान भारत कार्ड कसे डाउनलोड कराल? Ayushman Bharat Card Download
सर्वात आधी तुम्हाला प्ले-स्टोअरवर जाऊन आयुष्मान भारत हा ॲप इंस्टॉल करावा लागेल.
त्यानंतर इतर कोणत्याही ॲपवर जसे आपण लॉगिन करतो अगदी तसेचं लॉगिन करावे लागेल.
पुढे लाभार्थी असा पर्याय निवडून तुमचा मोबाईल नंबर आणि तुमच्या राहत्या राज्याबद्दल माहिती समाविष्ट करा
मग OTP दिल्यानंतर तुम्हाला एक “लॉक कोड” सांगा अशी सूचना देण्यात येईल
त्यानंतर शेवटी तुम्ही कार्ड (Ayushman Bharat Card Download) डाऊनलोड करू शकता.