Ayushman Bharat Yojana: आजारी पडल्यावर रुग्णालयात दाखल होणं म्हणजे मोठा आर्थिक बोजा. भल्याभल्यांची बचत उपचारातच खर्च होते. सामान्य आजारांवरही भाला मोठा खर्च येतो. गरीबांसाठी खासगी रुग्णालयातील उपचार तर अजिबातच परवडत नाहीत, परिणामी त्यांना शासकीय रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. याच समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना सुरु केली असून या योजनेद्वारे देशातील अनेक गरीब आणि गरजू लोकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा दिली जाते, तसेच अनेक मोठ्या शस्त्रक्रिया देखील मोफत करता येतात.
आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट शस्त्रक्रिया: (Ayushman Bharat Yojana)
आयुष्मान भारत योजना 1760 प्रकारच्या आजारांवर उपचार देते आणि आता यात 196 नवीन आजार आणि शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत आता खाजगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य झाले आहे.
या योजनेत खालील शस्त्रक्रियांचा समावेश आहे:
- प्रोस्टेट कर्करोग
- डबल वॉल्व रिप्लेसमेंट
- कोरोनरी आर्टरी बायपास
- पल्मनरी वॉल्व रिप्लेसमेंट
- स्कल बेस सर्जरी
- टिश्यू एक्सपेंडर
- बालरोग शस्त्रक्रिया
- रेडिएशन ओंकोलॉजी
- न्यूरोसर्जरी
- अँजियोप्लास्टी विद स्टेंट
याव्यतिरिक्त, मोतिबिंदू, सिजेरियन डिलिव्हरी आणि मलेरिया यांसारख्या अनेक आजारांवर उपचार या योजनेत समाविष्ट आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक:
- तुम्ही भारत सरकारद्वारे जारी केलेले आयुष्मान भारत कार्ड धारक असणे आवश्यक आहे(Ayushman Bharat Yojana).
- तुमचे वार्षिक कुटुंब उत्पन्न 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.