B. Ravi Pillai: एखाद्या माणसाचे यश पाहावे कि त्यामागची मेहनत? नक्कीच त्यामागे असलेली अफाट मेहनत. यश कुणालाही सहजसहजी मिळालेला नाही. त्याआधी भरपूर कष्ट हे करावेच लागतात आणि मग कुठेतरी जाऊन यश नेमकं कसं असतं हे अनुभवायला मिळतं. त्यामुळे कुठल्याही यशस्वी माणसाने संपन्न केलेलं यश नाही तर नेहमीच त्याने घेतलेली मेहनत पाहावी. तुम्ही बातम्यांमध्ये बी. रवी पिल्लई (B. Ravi Pillai) यांचं नाव ऐकलं असेल, त्यांनी वर्ष 2022 मध्ये H145 हेलिकॉप्टरची खरेदी केली होती. हेलिकॉप्टर हि नक्कीच साधी वस्तू नाही, चार पैसे कमावले म्हणून सहजासहजी विकत घेता येणारी नाही. मग कोण आहेत बी. रवी पिल्लई ज्यांनी या हेलिकॉप्टरची खरेदी केली हे जाणून घेऊया….
कोण आहेत बी. रवी पिल्लई (B. Ravi Pillai)?
RP ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमेन म्हणजेच B. Ravi Pillai . त्यांचा जन्म केरळ मधल्या एका सर्वसाधारण घरात वर्ष 1953 रोजी झाला होता. घरातील व्यवसाय म्हणजे शेती, त्यामुळे घरात गरिबी होतीच. आपण जन्माला कुठल्या घरात येतो हे महत्वाचं नाही, तर मेहनतीच्या जोरावर आपण पुढचं आयुष्य कसं घालवतोय हे अधिक महत्वाचं आहे. त्यामुळे एखाद्या सामान्य घरातल्या या माणसाने केवळ स्वकष्टावर यशाची मोठी शिखरं गाठली आहेत. अभ्यास सुरु असतानाच त्यांनी गावात जवळच्या सावकाराकडून काही पैसे उधार म्हणून घेतले होते आणि तेव्हापासूनच व्यवसायाची बी रोवलं होतं, पण अभ्यासाची आवड असल्यामुळे त्यांनी कोची महाविद्यालयातून बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन पर्यंत शिक्षणही पूर्ण केलं.
सुरुवातीपासूनच पिल्लई यांना व्यवसायाची आवड, म्हणून छोट्याश्या व्यव्यसायातून त्यांनी सर्वात आधी सावकाराचं कर्ज परत केलं आणि तरुण वयात स्वतःच एक बांधकामाची कामपणी उभारली. मात्र बांधकामाला गवंडी नसल्याने त्यांना हा व्यवसाय असफल झाला आणि थांबवावा लागला, प्रयत्न करणारा माणूस कधीच थकत नाही म्हणतात हेच खरं!! कारण पिल्लई (B. Ravi Pillai) देखील यानंतर खचून गेले नाहीत तर सरळ वर्ष 1978 मध्ये सौदी अरेबियाला निघाले आणि जवळपासच्या काही लोकांच्या मदतीने त्यांनी परदेशात बांधकाम कंपनी उभारली.
आज बी. रवी पिल्लई किती कमाई करतात?
परदेशात सुरु केलेल्या या व्यवसायानंतर त्यांनी पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज हाच व्यवसाय स्टील, गॅस, सिमेंट, शॉपिंग मॉल्स इत्यादी ठिकाणी पसरलेला आहे. आताच्या घडीला त्यांच्याजवळ 3.2 अरब डॉलर एवढी जास्त श्रीमंती आहे, तसेच त्यांनी सुरु केलेल्या कंपन्यांमध्ये 70,000 पेक्षाही अधिक लोकं काम करतात. तुम्हाला माहिती आहे का? आत्तापर्यंत H145 हेलिकॉप्टरची खरेदी करणारे ते (B. Ravi Pillai) पहिले भारतीय आहेत. या हेलिकॉप्टरला 2 पायलट मिळून चालवतात तर यामधून एकूण 7 माणसांसोबत प्रवास करता येतो. आज याच अरबपतीची गणना जगभरातील 1000 श्रीमंत लोकांमध्ये केली जाते, मात्र श्रीमंतीपेक्षाही त्यांनी कमावलेलं मोठं धन म्हणजे पद्मश्री पुरस्कार म्हणावा लागेल.