Bajaj Finance: बजाज फायनान्स कडून पैसे उभे करण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बजाज फायनान्स तब्बल 10 हजार कोटी रुपये उभारणार असून बोर्डकडून या योजनेला परवानगी मिळाली आहे. गुरुवारच्या शेअर बाजारात बजाजच्या शेअर्समध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळाली, मात्र या निर्णयाचा काय परिणाम होतो हे शुक्रवारचा झालेल्या व्यवहारात दिसून येईल.
Bajaj Finance कंपनीकडून कोणती माहिती समोर आली?
काल शेअर बाजार बंद झाल्यानंतर कंपनीकडून आलेल्या माहितीतून हे स्पष्ट होते कि येणाऱ्या काही दिवसांमध्ये बजाज कंपनी एक मोठी रक्कम उभी करणार आहे. याबद्दल अजून माहिती देताना कंपनीने म्हटले आहे कि कॉलीफाय्ड इन्शुरन्स प्लेसमेंटच्या (Qualified Insurance Placement) माध्यमातून ते जवळपास 8,800 कोटी रुपये उभे करणार आहेत. याशिवाय बजाज फिन्सर्व कन्हव्हर्टेबल वॉरंटी (Bajaj Fiserv Convertible Warranty) या इन्शुरन्सचा वापर करून ते जवळपास 1,200 कोटी रुपये उभे करतील.
बजाज फायनान्सच्या (Bajaj Finance) शेअरमध्ये वाढ झालेली आहे. व्यापाराच्या वेळी कंपनीच्या शेअर्समध्ये 7,913 रुपयांची वाढ दिसून आली. 22 सप्टेंबरला कंपनीने जेव्हा निधी उभा करण्याची माहिती सगळ्यात पहिल्यांदा जाहीर केली तेव्हा शेअर्सची किंमत 7,472 रुपये अशी होती. याचाच अर्थ कंपनीच्या शेअर्ससाठी चांगले दिवस सुरु आहेत, व यांच्या शेअर्समध्ये अजून वाढ होत आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे?
कंपनीची आर्थिक स्थिती पहिली तर बजाज फायनान्स चांगल्या पोझिशनवर आहेत. आर्थिक वर्ष 2024च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून महिन्यात कंपनीने (Bajaj Finance) 3,437 रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्यावर्षीचा आकडा पाहता यावर्षी 32 टक्क्यांची वाढ झालेली पाहायला मिळाली. जून महिन्यातील कंपनीचे व्याज उद्पादन 26 टक्क्यांनी वाढून 8,398 कोटी रुपये झाले आहे. गेल्या सहा महिन्यात बजाजच्या शेअर्समध्ये 21% वाढ झाली होती. हे सगळे आकडे पाहून लक्षात येतं कि बजाज फायनान्सची अठीक परिस्थिती सुधृढ आहे.