Bangalore City Development : बंगळुरू हे शहर अनेक IT कंपन्यांसाठी ओळखले जाते, देशातील विविध कोपऱ्यामधून कित्येक तरुण नोकरीच्या शोधात इथे येत असतात. बंगलोरमधील प्रसिद्ध कंपनी म्हणजे इन्फोसिस. अलीकडेच इन्फोसिस या भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीच्या मालकांनी म्हणजेच नारायण मूर्ती यांनी देशाच्या प्रगतीसाठी एक मार्ग सुचवला होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे देशातील युवकांनी दर आठवड्याला 70 तास काम करण्याची गरज आहे, आणि असे केल्यानंतरच भारत हा चीन सारख्या देशाला अगदी सोप्या तऱ्हेने मागे टाकत जगावर राज्य करू शकतो असेही त्यांनी म्हटले होते. नारायण मूर्ती यांच्या विधानाला अनेकांनी उचलून धरले तर कित्येक जणांनी त्यावर टीकास्त्र सोडले. आता पुन्हा एकदा नारायण मूर्ती यांनी बंगलोर शहराच्या विकासाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे, काय म्हणतात नारायण मूर्ती जाणून घेऊया….
बंगलोरला पुढील 5-10 वर्षांत चांगले शहर बनण्यासाठी आवश्यकता – Bangalore City Development
बुधवारी झालेल्या एका मुलाखतीत बोलताना इन्फोसिसचे मालक नारायण मूर्ती यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले. ते म्हणतात की सरकारने विशेष लक्ष देत पायाभूत सुविधांच्या प्रकल्प हाती घेण्याची गरज आहे. इथे होणारे काम एक ऐवजी तीन शिफ्ट मध्ये करणे महत्वाचे आहे. बुधवारी, मूर्ती (Narayana Murthy) बंगलोर टेक समिटमध्ये झेरोधाचे सह- संस्थापक निखिल कामथ यांच्याशी संभाषण करत होते, यावेळी कामथ यांनी भारतातील उच्च तंत्रज्ञान उद्योगाचे केंद्र असलेल्या बंगलोरला (Bangalore City Development) पुढील 5-10 वर्षांत एक चांगले शहर बनण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे यावर काही प्रकाश टाकण्यास सांगितले होते. ज्यावर नारायण मूर्ती म्हणाले की सॉफ्टवेअर सारख्या क्षेत्रात स्थानिक लोकांची टक्केवारी ही केवळ 60% पर्यंतच सीमित आहे, त्यामुळे राहिलेले लोक हे देशातील इतर भागांमधून कामाच्या शोधात कर्नाटक राज्यात येतात, शिवाय यात इतरात्र देशांमधून येणाऱ्या लोकांचा ही समावेश असू शकतो.
इंग्लिश माध्यमांच्या शाळेवर भर दिला पाहिजे:
बेंगलोर सारख्या शहराला (Bangalore City Development) अजून प्रगतिशील बनवण्यासाठी स्थानिक इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या विधानाला उदाहरणाची जोड देते म्हणाले की आज पर्यंत त्यांना भेटलेल्या अनेक महत्त्वाच्या लोकांनी त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच प्रवेश मिळवून दिला होता. त्यामुळे इंग्रजी माध्यमातून शिक्षण हे फार महत्वाचे आहे असे मात त्यांनी सदर कार्यक्रमात व्यक्त केले.
या कार्यक्रमात बोलताना नारायण मूर्ती यांनी पुन्हा भारताच्या विकासावरही भर दिला –
मूर्ती यांनी अधोरेखित केले की भारताचा GDP सुमारे 3.5 ट्रिलियन आहे तर चीनचा केवळ बेज हाच 19 ट्रिलियनचा आहे. परंतु ते म्हणाले की यामुळे नकारात्मक भावना मनात तयार करून घेण्याची गरज नाही. येणाऱ्या काही काळातच भारत चीनचा आकडा पकडेल आणि एक दिवस आशा आहे कि आपण चीनला कायमस्वरूपी मागे टाकून जगावर राज्य करायला निघालेलो असू. पण त्यासाठी सरकारने त्वरीत आवश्यक निर्णय घेणे आणि उद्या तयार होणाऱ्या उद्योजकांसमोरचे सर्व अडथळे दूर करणे अत्यावश्यक आहे.