Bank 5 Days Working । बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. लवकरच बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 2 दिवस जाहीर सुट्टी मिळू शकते. आत्तापर्यंत बँकेत दर रविवारी आणि महिन्यातील 2 शनिवारी सुट्टी मिळत होती. परंतु आता इंडियन बँकिंग असोसिएशन आठवड्यातून 2 दिवस सुट्टी देण्याचा विचार करत आहे. येव्हडच नव्हे तर येत्या 28 जुलै रोजी याबाबत अंतिम निर्णय सुद्धा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे बल्ले बल्ले पाहायला मिळत आहे.
28 जुलैला निर्णय होण्याची शक्यता- Bank 5 Days Working
इंडियन बँकिंग असोसिएशन (IBA) पुढील आठवड्यात पाच दिवसांचा कामकाजाचा (Bank 5 Days Working) आठवडा, वेतनवाढ आणि सेवानिवृत्तांसाठी गट वैद्यकीय विमा पॉलिसींची गरज याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. यासाठी बँक युनियन आणि बँक असोसिएशन यांनी शुक्रवार, २८ जुलै रोजी बैठक आयोजित केली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यापूर्वीच 19 जुलै रोजी सांगितले होते की त्यांनी मागील चर्चेवेळी बँका 5 दिवस सुरू करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे एकदा 28 जुलैच्या बैठकीत निर्णय झाला कि मग बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 2 दिवस सुट्टी मिळू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे.
सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मध्ये आठवड्यातून 5 दिवस कामकाजाचा (Bank 5 Days Working) नियम लागू केल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांना देखील आठवड्यातून 2 दिवस सुट्टी देण्यात यावी या मागणीला वेग आला होता. तसेच या मागणीला आमचा कोणताही आक्षेप नसल्याचे अर्थ मंत्रालयाने यापूर्वीच सांगितले होते. सध्या बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दर रविवारी आणि प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या शनिवारी सुट्टी असते. आता जर आठवड्यातून 2 दिवस बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळाल्यास नक्कीच त्यांच्यासाठी मोठी खुशखबर ठरेल परंतु असं झालयास कर्मचाऱ्यांना उर्वरित 5 दिवस दैनंदिन कामाचे तास 40 मिनिटांनी वाढवावे लागतील असेही म्हंटल जात आहे.