बिझनेसनामा ऑनलाईन । (Bank 5 Days Working ) देशातील सर्व बँका आठवड्यातून ५ दिवस सुरु राहणार आणि शनिवार- रविवार बँकांना सुट्ट्या देण्यात येणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. 28 जुलै रोजी झालेल्या इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) च्या बैठकीत या प्रस्तावावर सहमती झाली होती. आता हा प्रस्ताव IBA ने मंजूर केला असून अर्थखात्याकडे जाणार आहे. त्यामुळे बँकांना शनिवार- रविवार सुट्टी मिळण्याची शक्यता आणखी बळावली आहे. तसेच बँक कर्मचाऱ्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.
2 दिवस सुट्ट्यांच्या बदली रोज 40 मिनिटे काम वाढणार?
इंडियन बँक्स असोसिएशनचा प्रस्ताव जर अर्थखात्याने मंजूर केला तर मग महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारीही बँकांना सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. कारण सध्या महिन्यातील सर्व रविवार दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक कामकाज बंद असते . इंडियन बँक्स असोसिएशनच्या मे महिन्यात पार पडलेल्या बैठकीत असं सांगण्यात आले होते कि, आठवड्यातून 5 दिवस काम (Bank 5 Days Working) सुरु ठेवण्यात यावे आणि त्याबदली रोजच्या कामकाजामध्ये 40 मिनिटांची वाढ करावी. बँक कर्मचारी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत रोख व्यवहारांसह एकूण कामकाजाचे तास दररोज 40 मिनिटांनी वाढवू शकतात आणि वाढवलेली जी 40 मिनिटे आहेत त्यामध्ये नॉन-कॅश ट्रान्झॅक्शनचे काम केले जाईल असाही प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला होता.
आता बँका किती दिवस बंद असतात – Bank 5 Days Working
सध्या संपूर्ण देशात महिन्यातील दर रविवारी आणि दुसऱ्या- चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. तसेच वेगवेगळ्या राज्यानुसार, जे काही सण- उत्सव असतात त्या दिवशीही बँकांना सुट्टी देण्यात येते. आरबीआय प्रत्येक महिन्यातील बँकाच्या सुट्यांची यादी जाहीर करत असते. उदाहरणार्थ या महिन्याचे सांगायचं झाल्यास, ऑगस्ट महिन्यात तब्बल 14 दिवस बँक बंद आहेत . यामध्ये सर्व रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार, तसेच स्वातंत्र्यदिनासह अन्य काही सणांच्या दिवशीही बँक बंद असणार आहेत.