बिझनेसनामा ऑनलाईन । बँकेत आपण अकाऊट (Bank Account) उघडतो, कधी सेविंग तर कधी फिक्स्ड डेपोजीटसाठी. पण बँक अकाऊट हा फक्त बिल भरण्यासाठी आणि पैसे जमा करण्यासाठी नाही तर या व्यतरिक्त त्याचे अनेक फायदे आहेत, ज्यांच्याबद्दल आपल्याला कधीच माहिती नसते. पण आज आपण यांच्याबद्दल जाणून घेऊया कारण या गोष्टी खरच फार महत्वाच्या आहेत आणि यांची माहिती असल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारायला मदत होईल..
१) डिजिटल वोलेट:
याचा वापर करून तुम्ही Phonepay ,GooglePay यांसारखे अकाऊट तुमच्या बँकच्या खात्याशी जोडून घेऊ शकता. या दोघांमध्ये लिंक असल्याचा फायदा काय तर अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कोणालाही तुम्ही पैसे पाठवू शकता.
२) UPI पेमेंट: Bank Account
आजकाल UPI पेमेंटचा वापर देशभरात वाढत चालला आहे. खरं तर आपलाच देश हा सर्वाधिक UPI पेमेंटसाठी ओळखला जातो. अगदी छोट्यातल्या छोट्या दुकानांपासून ते थेट मोठमोठ्या मॉल पर्यंत UPI पेमेंटचा वापर करून पैश्यांची देवाणघेवाण करता येते. UPIच्या वापरणे पैसे पाठवणं सोपं झालाच पण यासोबत तुम्ही बिल भरण्यासारखी महत्वाची कामं घरबसल्या करू शकता. आणि हेच बिल दोन लोकांमध्ये वाटून भरता येतं.
३) फिक्स्ड किंवा रिकरिंग डेपोझीट:
बँकमध्ये तुमचा अकाऊट (Bank Account) असल्याचा एक मोठा फायदा आहे तो म्हणजे तुमच्या दररोजच्या अकाऊटमधून काही रक्कम ठराविक वेळेत फिक्स्ड किंवा रिकरिंग डेपोझीटमध्ये समाविष्ट केली जाऊ शकते. याचा फायदा काय तर आपोआपच पैसे सेव केले जातात. आणि आर्थिक कठीणाईचा सामना करण्यासाठी आपण तयार राहतो.
४) क्रेडीट कार्ड आणि नेट बँकिंग:
काही बँका आपल्या ग्राहकांना डेबिट किंवा क्रेडीट कार्डवर काही सवलती देऊ करतात. यात कधीकधी इन्शुरन्सचा समावेश होतो. अनेकवेळा तुम्हाला पैश्यांच्या व्याव्हारावर रोख लावायची संधी सुद्धा उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे बँककडून दिल्या जाणाऱ्या यां सर्व सुविधांचा फायदा करून घ्यावा आणि आपली आर्थिक कामं सोपी करवून घ्यावीत.