बिझनेसनामा ऑनलाईन । सध्या ऑनलाईन बँकिंगचे जग सुरू असून प्रत्येक घरातील व्यक्तींचे बँकेमध्ये अकाउंट (Bank Account) असतीलच. त्याचबरोबर मोदी सरकार आल्यानंतर जनधन योजना, किसान पीएम योजना अशा बऱ्याच योजनेसाठी नागरिकांकडून बँक अकाउंट बनवून घेण्यात आले आहेत. त्यामुळे देशात 95 टक्के ग्राहकांकडे स्वतःचे बँक अकाउंट असेल.
बऱ्याच कंपन्यांमध्ये सॅलरी साठी वेगवेगळ्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करावे लागते. त्यानंतर अकाउंट (Bank Account) मध्ये सॅलरी पाठवण्यात येते. त्याचबरोबर जर आपण कंपनी बदलली तर दुसऱ्या कंपनीमध्ये देखील सॅलरी साठी सांगितलेल्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करावं लागतं. अशाप्रकारे बऱ्याचदा एका व्यक्तीचे वेगवेगळ्या बँकेमध्ये अनेक अकाउंट ओपन होतात. परंतु एक व्यक्ती जास्तीत जास्त किती बँकेत आपले अकाउंट खोलू शकतो याबाबत तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया….
भारतात किती प्रकारचे बँक अकाउंट –
बँक अकाउंट चे (Bank Account) वेगवेगळे प्रकार असतात. त्यामध्ये सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, सॅलरी अकाउंट, जॉईंट अकाउंट यांचा समावेश होतो. पण बऱ्याचदा जास्ती करून अनेकजण सेविंग अकाउंट काढतात. जर तुमच्याकडे जास्त सेविंग अकाउंट असतील तर, तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या अकाउंट वर पैसे जमा करणे बंधनकारक असते. कारण एकाही अकाउंट मध्ये पैसे नसतील तर तीन महिन्यांनी ते अकाउंट बंद करण्यात येतं. दुसरीकडे जर तुम्हाला जॉईंट अकाउंट काढायचं असेल तर दोन किंवा त्यापेक्षा जास्त पार्टनर्स सोबत तुम्ही जॉईंट अकाउंट ओपन करू शकता. त्याचबरोबर पती-पत्नी सुद्धा जॉईन अकाउंट बनवू शकतात.
किती खाती काढा, नो टेन्शन – (Bank Account)
भारतामध्ये बँकेत सेविंग अकाउंट (Bank Account) बनवणाऱ्या ग्राहकांवर मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणीही कितीही संख्येमध्ये अकाउंट ओपन करू शकतो. पण त्यासाठी मल्टी सेविंग अकाउंटचे आपल्याला चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. जेणेकरून डिपॉझिट भरताना कोणत्याही गोष्टीचा त्रास आपल्याला होणार नाही आणि अकाउंट बंद पडणार नाही. याचबरोबर जर आपल्याकडे मल्टिपल सेविंग अकाउंट असतील तर त्याचा आपल्याला एक फायदा देखील होऊ शकतो. आणि व्यवस्थापन न जमल्यामुळे तोटा देखील होतो.