बिझनेसनामा ऑनलाईन । आज-काल डिजिटल बँकिंगची सुविधा सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे बँकेत जाऊन पैसे चेक (Bank Balance Check) करण्यापासून पैसे काढण्यापर्यंतचे सर्व कामे मोबाईल मध्ये होतात. गुगल पे, फोन पे यासारख्या प्लॅटफॉर्मवरून आपण पैसे ट्रान्सफर करतो. यासोबतच आपण याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अकाउंट बॅलन्स देखील चेक करू शकतो. परंतु ज्या व्यक्तींचे दोन पेक्षा जास्त बँक अकाउंट असतील आणि या अकाउंट नंबर ला गुगल पे, फोन पे यासारखे प्लॅटफॉर्म लिंक नसतील तर अकाउंट बॅलन्स चेक करण्यासाठी मोठे प्रॉब्लेम्स येतात. यावेळी त्यांना बँकेत जाऊनच त्यांच्या अकाउंट मधील बॅलन्स चेक करावे लागते. परंतु आज आम्ही तुम्हाला मोबाईल नंबर वरूनच बॅलन्स चेक करण्याची ट्रिक सांगणार आहोत. या ट्रिक च्या माध्यमातून तुम्ही बँकेत न जाता मोबाईलवरच तुमच्या बँक अकाउंट मधील बॅलन्स चेक करू शकतात.
मोबाईल वरून करा बँक बॅलन्स चेक
जर तुम्हाला तुमच्या अकाउंट मधील बॅलन्स चेक (Bank Balance Check) करायचा असेल तर तुम्हाला बँकेच्या नंबर वर मिस कॉल द्यावा लागेल. त्यानंतर बँकेकडून तुम्हाला SMS द्वारे डिटेल्स पाठवले जातील. यासाठी तुमचं अकाउंट असलेल्या बँकेचा नंबर तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. परंतु काळजी करू नका. आम्ही तुम्हाला आज प्रत्येक बँकेचे नंबर देणार आहोत. त्या बँकेच्या नंबरच्या आधारे तुम्ही त्यावर कॉल करून तुमचा अकाउंट बॅलन्स चेक करू शकतात. परंतु त्यासाठी तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर गरजेचा आहे.
रजिस्टर मोबाईल नंबर म्हणजे काय?
रजिस्टर मोबाईल नंबर म्हणजे तुमच्या बँक अकाउंटला लिंक असलेला नंबर. म्हणजेच तुम्ही जेव्हा बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी जातात त्यावेळी तुम्ही बँक अकाउंट डिटेल भरताना दिलेला मोबाईल नंबर म्हणजे रजिस्टर मोबाईल नंबर. या रजिस्टर मोबाईल नंबर वरूनच तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट मधील बॅलेन्स समजते. गुगल पे, फोन पे साठी देखील बँकमध्ये रजिस्टर असलेला नंबरच गरजेचा असतो. त्यावरून गुगल पे फोन पे या प्लॅटफॉर्म वरून पैसे ट्रान्सफर झाल्यास अकाउंट बॅलन्स, क्रेडिट अँड डेबिटचा मेसेज या नंबर वर येतो. बँकेमध्ये तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच नंबर वरून तुम्ही बँकेच्या नंबर वर मिस कॉल करू शकतात.
अशा पद्धतीने बँकेसोबत रजिस्टर करा तुमचा मोबाईल नंबर
जर तुमच्या बँकेसोबत तुमचा सध्याचा चालू नंबर रजिस्टर केलेला नसेल तर हा नंबर देखील तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून बँकेसोबत रजिस्टर करू शकतात. यामुळे तुम्हाला बँक अकाउंट बॅलन्स समजण्यासाठी देखील मदत होईल. यासाठी तुम्हाला खालील प्रोसेस करावी लागेल. ही संपूर्ण प्रोसेस प्रत्येक बँकेसाठी सेम आहे.
1) सर्वात आधी तुमच्या मोबाईल मध्ये मेसेज ओपन करा.
2) यानंतर बँकेच्या नंबर वर तुम्हाला मेसेज सेंड करावा लागेल.
3) मेसेज सेंड करण्यासाठी बँकेच्या नंबरवर REG टाकून यापुढे तुमचे अकाउंट नंबर टाका.
4) त्यानंतर हा मेसेज बँकेच्या नंबर वर सेंड करा.
5) जसा तुमचा मोबाईल नंबर आणि अकाउंट नंबर मॅच होईल, त्यानंतर तुम्हाला सक्सेस असा मेसेज येईल.
6) ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा नंबर बँक अकाउंट सोबत रजिस्टर झाला असेल.
या बँकेच्या नंबरवर मिस कॉल देऊन चेक करा बँक बॅलन्स (Bank Balance Check)
एक्सिस बैंक : 1800-419-5959
बैंक ऑफ बड़ौदा : 919223011311
धन लक्ष्मी बैंक : 918067747700
IDBI बैंक : 1800-843-1122
कोटक महिंद्रा बैंक : 1800-274-0110
PNB : 1800-180-2222
ICICI बैंक : 02230256767
HDFC बैंक : 1800-270-3333
बैंक ऑफ इंडिया : 02233598548
केनरा बैंक : 919015483483
कर्नाटक बैंक : 1800-425-1445
इंडियन बैंक : 919289592895
Yes बैंक : 919223920000
करूर वैश्य बैंक : 919266292666
सारस्वत बैंक : 919223040000
बंधन बैंक : 1800-258-8181
RBL बैंक : 1800-419-0610
DCB बैंक : 917506660011