Bank Charges : बँक खात्यातून दर महिन्याला इतके पैसे होतात कट; पहा कोणकोणते चार्जेस पडतात

बिझनेसनामा ऑनलाईन (Bank Charges)। बँकेत प्रत्येकाचे खाते असते. बँकेत अकाउंट नाही असा व्यक्ती क्वचितच देशात असेल. काही जण तर २-३ बँकेत आपला खाते काढतात. प्रधानमंत्री जन-धन योजनेनंतर देशातील अनेकांनी बँक खाती उघडली आहेत. तुमचे सुद्धा बँकेत खाते असल्याने तुम्हाला लक्षात आले असेल कि बँका वेगवेगळ्या सर्व्हिस च्या नावाखाली तुमच्या अकाउंट वरून पैसे काढून घेत असतात. हे चार्जेस म्हणजे नेमके काय? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

देखभाल शुल्क

सर्व बँक खाती सुरळीत चालवण्यासाठी बँक ग्राहकाकडून देखभाल शुल्क घेते.या चार्जेसचे दर वेगवेगळ्या बँकानुसार भिन्न असू शकतात. बँकेच्या नियम आणि अटींद्वारे तुम्ही या शुल्काविषयी जाणून घेऊ शकता.

डेबिट कार्ड शुल्क

जेव्हा आपण बँकेत नवीन खाते सुरु करतो तेव्हा बँकेकडून आपल्याला डेबिट कार्ड दिले जाते. या कार्डसाठी बँक ग्राहकांकडून शुल्क आकारते. हे शुल्क वार्षिक आधारावर घेतले जाते.

ATM चार्ज – (Bank Charges)

ATM तर आपण सर्वजण वापरत असतो. परंतु त्याचे काही नियम असतात. जेव्हा आपण दुसऱ्या बँकेच्या ATM मधून पैसे काढतो तेव्हा त्यासाठी एटीएमचे शुल्क भरावे लागते. तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक आहात त्या बँकेतून तुम्ही महिन्यातून 4 वेळा पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

अकाउंट वर कमी पैसे असल्यास-

बँकेचे जे काही नियम असतात त्या नियमानुसार, जर तुमच्या बँकेत कमीत कमी पैसे असतील तर अशा वेळीही बँक तुमच्याकडून शुल्क आकारते. पण जर तुमच्या बँकेत नियमानुसार, पैसे असतील तर मात्र तुमच्यावर चार्जेस आकारले जात नाहीत.

ट्रान्सफर चार्ज

आपण पेमेंट करत असताना UPI, IMPS, RTGS, NEFT सारख्या डिजिटल माध्यमातून पेमेंट करतो तेव्हा तुम्हाला त्यासाठी शुल्क भरावे लागते.

अकाउंट बंद केल्याचे चार्जेस –

जर तुम्ही बँक खाते बंद केले तर बँक तुमच्याकडून शुल्क आकारू(Bank Charges) शकते. त्यामुळे अकाउंट बंद करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा, आंधळेपणा ठेऊ नका.

बँकेत २ प्रकारची खाती उघडली जातात – एक म्हणजे सेविंग अकाउंट आणि दुसरं म्हणजे चालू खाते. बचत खाते आणि चालू खाते. सामान्य लोक फक्त सेविंग अकाउंट काढतात तर दुसरीकडे मोठे आर्थिक व्यवहार करणारे लोक शक्यतो चालू खाते सुरु करतात. जेव्हा आपण सेविंग अकाउंट काढतो तेव्हा त्यातही २ प्रकारची खाती असतात. एक म्हणजे झिरो बचत खाते, म्हणजेच एक असं अकाउंट ज्यामध्ये कमीत कमी कितीही रक्कम ठेवली तर चालते आणि दुसरं म्हणजे मिनिमम बैलेंस सेविंग अकाउंट ज्यामध्ये बँकेने सांगितलेल्या निश्चित रकमेपेक्षा कमी पैसे ठेवता येत नाहीत.