Bank Employees: बँकांसाठी आठवड्यातून 5 दिवस काम: लवकरच निर्णय होणार का?

Bank Employees: आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मोदी सरकार बँक कर्मचाऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून 5 दिवस काम करण्याच्या योजनेला मंजूरी देण्याचा विचार करत आहे. याशिवाय, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बँक युनियन्समध्ये झालेल्या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनाही पगारात 17 टक्के वाढ मिळू शकते.

बँकांना मिळणार का एक्सट्रा सुट्टी? (Bank Employees)

सरकारी कार्यालये, आरबीआय आणि भारतीय आयुर्विमा महामंडळासारख्या संस्थांमध्ये आधीच लागू असलेला आठवड्यातून 5 दिवस काम करण्याचा नियम लवकरच बँकांमध्येही लागू होऊ शकतो. बँक संघटनांनी याबाबत सरकारकडे आवाहन केले होते आणि आता सरकार या प्रस्तावाच्या बाजूने असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. वर्ष 2015 मध्ये सरकारने एक महत्वाची अधिसूचना जारी केली होती ज्यामध्ये 1881 च्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्टच्या कलम 25 अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी घोषित करण्यात आली होती.

देशातील बँकिंग क्षेत्रात 16.35 लाख कर्मचाऱ्यांची फौज:

देशातील बँकिंग क्षेत्रात रोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ झाली आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये तसेच पेमेंट बँक आणि लघु वित्त बँकांसह 15.4 लाख कर्मचारी कार्यरत आहेत (Bank Employees) तर प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील 95,000 कर्मचारी काम करतात.