Bank Employees Salary Hike : काही दिवसांताच 2023 हे वर्ष संपून आपण नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत. देशातील प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निमित्ताने पगार वाढ होण्याची अपेक्षा आहे आणि याला बँकेचे कर्मचारी अपवाद नाहीत. मात्र आता बँक कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे, कारण लवकरच त्यांच्या पगारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. इंडियन बँक असोसिएशन आणि इतर बँक युनियन या दोघांमध्ये बँकत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सुधारणा केली जावी यात एकमत झाल्याने, ही मोठी बातमी समोर आली आहे. तर बँकच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होणार हे जाणून घेऊया…
बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी (Bank Employees Salary Hike)
नवीन वर्षात प्रवेश करत असताना देशातील बँकच्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. 2021- 22 या आर्थिक वर्षापासून पुढे पाच वर्षांसाठी पगारात 17 टक्के वार्षिक वाढ करण्यावर अधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे. मात्र हा निर्णय स्वीकार करण्याआधी देशातील बँकांनी शनिवारी त्यांना सार्वजनिक सुट्टी घोषित करावे अशी मागणी केली आहे. इंडियन बँक असोसिएशन आणि इतर बँक युनियन यांच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या पगार वाढीच्या निर्णयानुसार आता पगार आणि भत्यात सरासरी 17 टक्क्यांची वाढ होणार आहे आणि त्यानंतर बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच वर्षांसाठी नवीन वेतन श्रेणी लागू होईल (Bank Employees Salary Hike). काही दिवसांमध्ये बँकांच्या नफ्यात भरपूर वाढ झाल्याचे संघटनांचे म्हणणे आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता सार्वत्रिक निवडणुका होण्यापूर्वीच वेतन करार पूर्ण होण्याच्या अपेक्षा केल्या जात आहेत.
काय होती बँकेच्या संघटनांची मागणी?
देशातील बँकांनी एकत्र येऊन सरकारजवळ शनिवारी देखील त्यांना सार्वजनिक सुट्टी द्यावी अशी या मागणी केली होती. आणि आता पाच दिवसांच्या कामकाजाचा निर्णय जाहीर झाल्यावरच बँकांच्या संघटना अंतिम करारावर स्वाक्षरी करतील असे त्यांनी सांगितले आहे. बँक संघटनांच्या या प्रस्तावाबद्दल राज्यातील अर्थमंत्री भागवत कराड यांनी संसदेत SBI कडून सदर प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती दिली होती मात्र सरकारकडून या प्रस्तावाला सहमती दर्शवण्यात आलेली आहे की नाही हे मात्र अद्याप उघड झालेले नाही.