Bank Employees: बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; IBA आणि Bank Union कडून पगारवाढीला मंजुरी

Bank Employees: तुम्ही बँकेचे कर्मचारी आहात का? हो तर ही बातमी नक्कीच वाचा कारण आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. Indian Banks Association आणि बँक कर्मचारी संघटनांनी (Bank Union) 17 टक्के वार्षिक वेतनवाढ करण्यासाठी होकार दिल्याने बँकांमध्ये काम करणाऱ्या लोकांना आता लवकरच पगारवाढ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी काही सुधारित तासांची माहिती लवकरच सरकारकडून पोहोचवली जाईल, मात्र या निर्णयाचा फायदा देशातील 8 लाख कर्मचाऱ्यांना होणार हे मात्र नक्की.

बँक कर्मचाऱ्यांविषयी झाली चर्चा: (Bank Employees)

1 नोव्हेंबर 2022 रोजी 11 वा वेतन करार संपल्यानंतर Bank Union आणि IBA यांच्यात बँक कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत चर्चा सुरू होती. अखेरीस, आज म्हणजेच शुक्रवारी 17 टक्के पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन बँक्स असोसिएशनचे (IBA) अध्यक्ष ए के गोयल(A.K Goyal) यांनी याबाबतची माहिती दिली आणि आता याबद्दलचा पुढील आढावा घेण्यासाठी नोव्हेंबर 2027 मध्ये आणखीन एकदा चर्चा केली जाईल असेही सांगितले.

याअगोदर म्हणजेच 7 मार्च रोजी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातून एक महत्वाचा निर्णय जारी करण्यात आला होता(Bank Employees), ज्याच्यानुसार केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात (DA) 4 टक्क्यांची वाढ केली होती, या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा मिळणारा DA 46 टक्क्यांवरून 50 टक्के इतका झाला आणि याचा फायदा देशभरातील सुमारे 50 लाख कर्मचाऱ्यांनी आणि 68 लाख पेन्शनधारकांनी मिळवला आहे.