Bank FD Rates: मुदत ठेवीवर अधिक परतावा मिळवायचा आहे का? ‘ही’ बातमी नक्की वाचा

Bank FD Rates: बँक ऑफ बडोदाने (BOB) FD वरील व्याजात वाढ केली आहे. 15 फेब्रुवारी 2024 पासून लागू झालेल्या या नवीन दरांमुळे, तुम्हाला तुमच्या बचतीवर आणखी चांगले परतावा मिळणार आहे. BOB ने एक वर्ष ते 400 दिवस आणि 400 दिवस ते 2 वर्ष या मुदतीसाठी FDवरील व्याजदर 0.10 टक्क्यांनी वाढवले आहेत. या वाढीमुळे, तुम्हाला या दोन्ही मुदतीसाठी 6.85 टक्के व्याज मिळेल, जे की अगोदर 6.75 टक्के होते.

कॅनरा बँकने देखील वाढवले व्याज: (Bank FD Rates)

होय!! तुम्ही ते बरोबर ऐकले आहे, कॅनरा बँकेने 19 फेब्रुवारी 2024 पासून 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या FD वर (म्हणजेच Bulk FD वर) व्याजदरात वाढ केली आहे. लक्ष्यात घ्या की, 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या FD ला Bulk FD म्हणतात(Bank FD Rates). कॅनरा बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठी Bulk FD देत आहे. यावर बँक 6 टक्के ते 7.25 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.

तुम्हाला काय मिळेल?

  • 7 ते 45 दिवसांच्या FDवर 6% व्याज
  • 46 ते 90 दिवसांच्या FDवर 6.25% व्याज
  • 91 ते 179 दिवसांच्या FDवर 7.20% व्याज
  • 180 ते 269 दिवसांच्या FDवर 7.25% व्याज