मुंबई (Bank Holiday) : बँक कर्मचाऱ्यांना लवकरच आठवड्यातून फक्त 5 दिवस काम करण्याची परवानगी मिळणार आहे. एका अहवालानुसार, युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉईज आणि इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) यांनी दीर्घकाळापासून सुरू असलेल्या पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्यावर चर्चा केली आहे. बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस सुट्टी देण्याच्या निर्णयाबाबत लवकरच घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बँक कर्मचारी सोमवार ते शुक्रवारपर्यंत असे ५ दिवस काम करतील अन आठवड्यातून दोन दिवस (शनिवार, रविवार) सुट्टी घेतील असे सांगितले जात आहे.
दर शनिवारी सुट्टी?
निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम 25 नुसार शनिवारची सुट्टी सरकारला प्रत्येक वेळी जाहीर करावी लागते. हा करार अल्प कालावधीसाठी असून तो पगाराच्या अधीन नसल्याचे ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनचे सरचिटणीस एस नागराजन यांनी सांगितले. तेव्हा सरकारने बँकांच्या आठवड्यातून दोन दिवस सुट्ट्यांच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली पाहिजे आणि आरबीआयने देखील ही योजना स्वीकारली पाहिजे असे म्हटले आहे. Bank Holiday
बँकेचे कामाचे तास वाढतील
जर बँकांना आठवड्यातून दोन दिवस सुट्ट्या देण्यात आल्या तर बँक कर्मचारी दररोज सकाळी 9.45 ते सायंकाळी 5:30 या वेळेत 40 मिनिटे जादा काम करतील. सध्या महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. बँक युनियन अनेक दिवसांपासून पाच दिवसांच्या कामाची मागणी करत आहेत.
हि काम पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार?
बँकेचे ग्राहक सुट्टीच्या काळात आपली कामे ऑनलाइन पद्धतीने करू शकतात. यामध्ये मोबाइल बँकिंग, एटीएम आणि इतर कामे ऑनलाईन होऊ शकतात. मात्र, बँकेच्या शाखेशी संलग्न केलेले पासबुक छापणे, कर्ज घेणे किंवा इतर कोणतेही महत्त्वाचे काम करण्यासाठी ग्राहकांना बँकेत येणे अनिवार्य आहे.
बँकेच्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकांत केव्हापासून बदल होणार? Bank Holiday
वित्त मंत्रालय लवकरच बँकेच्या सुट्ट्यांच्या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकते. इंडियन असोसिएशन आणि युनायटेड फोरम बँकेच्या कर्मचाऱ्यांनी या कराराला सहमती दर्शवल्याचे मंत्रालयाने म्हटले होते. मात्र, कर्मचाऱ्यांचा कामाचा कालावधी ४० मिनिटांनी वाढणार आहे.