Bank Holiday in April: ग्राहकांनो सावधान!! एप्रिल महिन्यात 14 दिवस बँका बंद

Bank Holiday in April: येत्या आठवड्यापासून एप्रिल 2024 सुरु होणार आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एप्रिल महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. या यादीनुसार, पुढच्या महिन्यात बँका 14 दिवस बंद राहणार आहेत. म्हणून, तुम्ही बँकेत जाण्याचे आणि एखादे काम करण्याचे नियोजन करत असाल तर, आधीच एप्रिल 2024 च्या बँक सुट्ट्यांची यादी एकदा जरूर तपासून घ्या. ही सुट्टीची यादी विविध राज्यांमध्ये येणाऱ्या सण आणि जयंतींनुसार बनवली जाते.

एप्रिल महिन्यातील सुट्या: (Bank Holiday in April)

एप्रिल महिन्यात रोजच्या रविवार (7, 14, 21, 28) सोबतच दुसऱ्या (13) आणि चौथ्या शनिवारी (27) बँका नियमानुसार बंद राहतील., त्यामुळे तुमच्या आर्थिक व्यवहाराचे नियोजन करताना तुम्ही या सुट्ट्यांना विसरून चालणार नाही बाकी आगामी एप्रिल महिना तुमच्या आर्थिक व्यवहाराच्या नियोजनासाठी खास आहे कारण या महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांची मालिका आहे, यामुळे तुमच्या बँकेच्या व्यवहारांसाठी थोडी तारीख निश्चित करणे आवश्यक आहे.

एप्रिल महिन्यातील बाकी सुट्ट्या:

हिशेबाच्या अखेरच्या कामासाठी सुट्टी (1 एप्रिल): नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला बँकांना त्यांचे वार्षिक हिशेब बंद करावे लागतात. त्यामुळे, 1 एप्रिल रोजी बहुतांश राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

सण आणि जयंती निमित्त सुट्ट्या: या महिन्यात गुढी पाडवा/उगादी, राम नवमी, आणि इतर सणांच्या निमित्ताने वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका बंद राहतील(Bank Holiday in April). 11 एप्रिल रोजी ईदच्या निमित्ताने अनेक ठिकाणी बँका बंद असतील. सुट्टीच्या संपूर्ण यादीसाठी तुमच्या बँकेशी संपर्क साधा.

महत्वाची माहिती: तुमच्या बँकेच्या शाखेची सुट्टीची माहिती त्यांच्या Website वर किंवा तुमच्या बँकेच्या Mobile App वर पाहू शकता. तसेच, या काळात बँकेच्या Online सेवा सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या बँकेशी याबाबत अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा.