Bank Holiday In August 2023। जुलै महिना संपायला अवघा 1 आठवडा राहीला असून लवरच ऑगस्ट महिना सुरू होईल. जुलै महिन्याप्रमाणेच ऑगस्ट मधेही बँकांना मोठ्या प्रमाणात सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. आज- काल सर्व ठिकाणी डिजिटल पद्धतीने पैसे काढले जातात त्यामुळे बँकेत जाण्याची जास्त गरज भासत नाही. परंतु याला अपवाद, बँकेमध्ये काही कामकाजांसाठी, केवायसी साठी, आधार लिंक करण्यासाठी बँकेमध्ये जावेच लागते. त्याचबरोबर 2000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यामुळे त्या एक्सचेंज करण्यासाठी सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे जर तुमचेही ऑगस्ट महिन्यात बँकेत काही नकाम असेल तर सणासुदीच्या नियोजनानुसारच बँकेत जाण्याचा निर्णय घ्या. कारण ऑगस्ट महिन्यामध्ये 14 दिवस बँकेला सुट्ट्या देण्यात येणार आहे.
भारतीय रिझर्व बँकेने ग्राहकांसाठी बँक सुट्ट्यांची लिस्ट जारी (Bank Holiday In August 2023) केली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये बरेच सण उत्सव, जयंती आणि शनिवार- रविवार असल्यामुळे तब्बल 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामुळे ग्राहकांची धावपळ होऊ नये यासाठी आरबीआयने या सुट्ट्यांची लिस्ट जारी केली आहे. त्यानुसार तुम्ही नियोजन करून बँकेत जाऊन तुमचे काम पूर्ण करू शकतात. 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिन असल्यामुळे पूर्ण देशातील बँक बंद राहतील. त्याचप्रकारे ओनम, रक्षाबंधन यासारख्या सणांनिमित्त देखील पूर्ण देशभर बँक बंद ठेवण्यात येणार आहे.
‘या’ दिवशी बंद राहतील बँक– (Bank Holiday In August 2023)
6 ऑगस्ट रविवार
8 ऑगस्ट गँगटोक मध्ये सुट्टी
12 ऑगस्ट दुसरा शनिवार
13 ऑगस्ट रविवार
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन
16 ऑगस्ट पारसी नववर्ष
18 ऑगस्ट श्री शंकर तिथी, गुवाहाटीमध्ये सुट्टी
20 ऑगस्ट रविवार
26 ऑगस्ट चौथा शनिवार
27 ऑगस्ट रविवार
28 ऑगस्ट ओणम
29 ऑगस्ट तिरुओनम
30 ऑगस्ट रक्षाबंधन
31 ऑगस्ट श्री नारायण गुरु जयंती
ऑगस्टमध्ये पूर्ण 14 दिवस बँकांना सुट्टी राहणार असल्यामुळे (Bank Holiday In August 2023) बँके संबंधित कोणतेही कामकाज असल्यास तुम्ही सुट्टीचे दिवस वगळून बँकेत जाऊन काम पूर्ण करू शकतात. एवढेच नाही तर बँकेच्या ऐवजी तुम्ही यूपीआय मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंग आणि एटीएम चा देखील वापर करून पैसे काढू शकता. दरम्यान, येत्या काही दिवसात बँकेचा कामकाज आठवडा ५ दिवसांचा करून बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातून २ दिवस सुट्टी देण्याचा निर्णय सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या बँक कर्मचाऱ्यांचे बल्ले बल्ले आहे असं म्हणत तरी चुकीचे ठरणार नाही.