बिझनेसनामा ऑनलाइन | येत्या 2 दिवसांत सप्टेंबरचा महिना सुरु होईल आणि तुम्हाला माहिती आहे का या महिन्यामध्ये बँकांना तब्बल 16 दिवसांची सुट्टी (Bank Holiday In September 2023 ) मिळणार आहे . आत्ताच Reserve Bank ने जारी केलेल्या Holiday List नुसार या महिन्यात सुट्ट्यांचा भडीमार असणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे याच महिन्यात 2 हजारच्या नोटा बदलण्याची कार्यवाही सुरु केली जाईल. कृष्ण जन्माष्टमी , गणेश चतुर्थी, ईद असे अनेक सण सप्टेंबर महिन्यात साजरे केले जाणार आहेत. दिल्लीत 8 ते 10 तारखेला G-20 summit होणार असल्याने तिथल्या बँकांना सुट्टी देण्यात येणार आहे. या सर्व सुट्ट्या पाहता तुमची बँकेतील काही महत्वाची कामं अडकून न पडावीत असे तुम्हाला वाटत असेल तर सुट्ट्यांच्या आधी ती पूर्ण करून घ्या.
RBI ने जारी केली बँकांसाठी सुट्ट्यांची यादी : (Bank Holiday In September 2023)
Reserve Bank Of India द्वारे देशातील सर्व बँकांना सप्टेंबर महिन्यात बँकांना असलेल्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. सप्टेंबर महिन्यात येणार सण आणि शनिवार- रविवार पाहता सुट्ट्यांचा आकडा 16 च्या जवळ पोहोचला आहे. या महिन्यात गणेश चतुर्थी, जन्माष्टमी, ईद असे अनेक सण एका मागून एक येऊन घालणार आहेत.
3 सप्टेंबर : रविवारमुळे देशभरातील बँका बंद
6 सप्टेंबर : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पाटणा झोनमध्ये बँका बंद राहतील.
7 सप्टेंबर: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अहमदाबाद, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, तेलंगणा, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनौ, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला आणि श्रीनगर झोनमध्ये बँकांना सुट्टी.
9 सप्टेंबर : दुसऱ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
10 सप्टेंबर : रविवारमुळे देशातील बँका बंद आहेत.
17 सप्टेंबर : रविवारी निमित्त बँकांना सुट्टी असेल.
18 सप्टेंबर: विनायक चतुर्थीनिमित्त बेंगळुरू, तेलंगणा झोनमध्ये बँकांना सुट्टी.
19 सप्टेंबर : गणेश चतुर्थीनिमित्त अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर, पणजी येथील विभागीय बँकांना सुट्टी .
20 सप्टेंबर: कोची आणि भुवनेश्वर झोनमधील बँका गणेश चतुर्थी/ नुखाईमुळे बंद राहतील.
22 सप्टेंबर: श्री नारायण गुरु समाधीनिमित्त फक्त कोची, पणजी आणि त्रिवेंद्रम झोनमध्ये बँका बंद राहतील.
23 सप्टेंबर : चौथ्या शनिवारी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
24 सप्टेंबर : रविवार असल्यामुळे संपूर्ण देशातील बँका बंद राहणार आहेत.
25 सप्टेंबर : श्रीमंत शंकरदेव जयंतीनिमित्त गुवाहाटी झोनमध्ये बँकेला सुट्टी असेल.
27 सप्टेंबर : मिलाद-ए-शरीफनिमित्त जम्मू, कोची, श्रीनगर, त्रिवेंद्रम झोनमध्ये बँका बंद राहणार आहेत.
28 सप्टेंबर: ईद-ए-मिलादच्या निमित्ताने अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, तेलंगणा, इंफाळ, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची झोनमध्ये बँकाना सुट्टी असेल.
29 सप्टेंबर : ईद-ए-मिलाद असल्यामुळे फक्त गंगटोक, जम्मू आणि श्रीनगर झोनमध्ये बँका बंद राहतील.
Holiday List लक्षात घेणं गरजेचं का?
बँक सोबत जर का तुमची काही महत्वाची कामं असतील तर ती तुम्ही ताबडतोब करून घ्यावीत. जेणेकरून ऐनवेळी गैरसोय होणार नाही. बाकी महिनांच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात जरा जास्ती सुट्ट्या (Bank Holiday In September 2023 ) मिळणार आहेत. पैशांचा व्यवहार काही एका दिवसात संपणारा नसतो, तरीही शक्यतो वेळेअगोदर सावध राहत आपली कामं करून घ्यावीत. आजच्या ऑनलाइन पेमेंटच्या जगात किरकोळ गोष्टींसाठी आपल्याला बँकेची पायरी चढावी लागत नाही तरीही जर का कुणाची देणी बाकी असेल, हफ्ता देण राहिलं असेल, NEFT payment करायची असल्यास अशी कामं करून घ्यावी.