Bank Holiday : 22 तारखेला देशात राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे, आणि गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय ज्या दिवसाची डोळ्यात तेल घालून वाट पाहत होते तो क्षण आता केवळ एक दिवस दुर आहे. सर्व राम भक्तांना हा सोहळा मनात कायमचा साठवून ठेवता यावा म्हणून या दिवशी देशांतर्गत सर्व सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, स्टॉक बाजार बंद राहणार आहेत. मात्र बँकांचं काय? देशभरात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे सर्वच बँका बंद असतील का? असा प्रश्न तुमच्या मनात तयार झाला असेल. 22 तारखेला होणाऱ्या सोहळ्याचं अनन्यसाधारण महत्व आहे, अयोध्येत होणाऱ्या सोहळयाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित असतील.
देशातील बँका नेमक्या किती दिवस बंद? (Bank Holiday)
अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळेच उत्तर प्रदेशातील बँका 22 तारखेला बंद असणार आहेत, उत्तर प्रदेश सरकारने हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केल्याने बँकांचे कामकाज त्यादिवशी चालणार नाही. 22 जानेवारीला म्हणजेच सोमवारी बँकांना सुट्टी असल्यामुळं पुढील आठवड्यात उत्तर प्रदेशात फक्त दोन दिवस बँका सुरू राहतील. 21 जानेवारी हा रविवार असल्याने ती बँकांची आठवड्याची सुट्टी असते. 22 तारखेला देशातील काही बँकांना दुपारी 2:30 पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे, आणि याच्याच परिणामी 23 तारखेपासून देशात बँकांचे कामकाज व्यवस्थित सुरु होईल.
बँकांना सलग 4 दिवस सुट्ट्या :
25 जानेवारी रोजी हजरत मोहम्मद अली यांच्या जयंती निमित्ताने देशातील बँकांना सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. 26 तारखेला आपला प्रजासत्ताकदिन असल्यामुळे हा दिवस दरवर्षी सरकारी सुट्टी म्हणून गणला जातो. 27 तारीख हा महिन्याचा चौथा शनिवार आहे आणि 28 तारीख रविवार असल्याने देशभरात सलग चार दिवस बँका बंद असणार आहे(Bank Holiday). लक्ष्यात असुद्या की पुढील आठवड्यात तुमच्या बँकांचे कमकाज संपवण्यासाठी केवळ 2 दिवसांचा अवधी मिळणार आहे आणि बाकी दिवस बँका बंद असतील.
या दिवशी बँका असतील बंद :
21 जानेवारी 2024- रविवार
22 जानेवारी 2024- इमोइनू इराप्टामुळे इम्फाळमध्ये बँका बंद राहतील आणि उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिर उद्घाटन सोहळ्यामुळं बँका बंद राहतील.
23 जानेवारी 2024- इंफाळमध्ये बँकांना सुट्टी असेल.
25 जानेवारी 2024- थाई पोशम, हजरत मोहम्मद अली यांच्या जयंतीनिमित्त चेन्नई, कानपूर आणि लखनऊ येथील बँकांना सुट्टी असेल.
26 जानेवारी 2024- प्रजासत्ताक दिन
27 जानेवारी 2024- चौथा शनिवार
28 जानेवारी 2024- रविवार