Bank Holidays In Diwali : दिवाळीच्या निमित्ताने 6 दिवस बंद असतील बँका

Bank Holidays In Diwali : दिवाळी तोंडावर असताना जशी शाळा आणि कॉलेजला सुट्टी दिली जाते त्याच प्रमाणे बँकाही काही दिवसांसाठी बंद राहणार आहेत, आता रिझर्व बँककडून आलेल्या आदेशानुसार या बँका बंद राहतील पण विविध राज्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या सुट्या वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे तुमच्या राज्यात सुट्टी अमलात कधी आणली जाणार आहे हे जाणून घेऊन मगच तुमची महत्वाची कामं निश्चित करा. मात्र कुठलीच कामं पुढे ढकलू नका कारण जरी आजच्या डिजिटल जगात अनेक कामं ऑनलाईन होत असली तरीही काही महत्वाचा कामांसाठी बँकमध्ये जाणं भाग ठरू शकत, आणि असं नाही केल्यास कदाचित तुमची अत्यंत महत्वाची कामं अडकून पडू शकतात.

दिवाळीनिमित्त या दिवशी देशांत बंद असतील बँका: Bank Holidays In Diwali

पुढच्या आठवड्यातील 7 दिवस हे अत्यंत व्यस्त असणार आहेत. कारण पुढच्या आठवड्यात दिवाळी सोबतच बाकी अनेक सण एका रांगेत येणार आहे. धनत्रयोदशी पासून सुरु होणारी शृंखला भाऊबीजे पर्यंत चालणार आहे. त्यामुळे 10 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत तरी निश्चितच बँका बंद राहणार आहे, तर काही राज्यांमध्ये हि सुट्टी सहा दिवसांची सुद्धा असू शकते.

10 नोव्हेंबर रोजी देशभरात धनत्रयोदशी असल्यामुळे बँका बंद असू शकतात, तसेच मेघालयात याच दरम्यान वांगला महोत्सवाच्या निमित्ताने तिथे बँका बंद असतील. दर महिन्यात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी दिली जाते, 11 नोव्हेंबर हा महिन्यातला दुसरा शनिवार असल्याने या दिवशी देशभरात बँकांना सुट्टी दिली जाईल. 12 तारीख हि रविवारी येते आणि पुढे 13 ते 15 तारखेपर्यंत देशात दिवाळीचे वातावरण असणार आहे, यामुळे राज्यांच्या रूढी आणि परंपरांना धरून बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. देशात बँका जरीही बंद असल्या (Bank Holidays In Diwali) तरीही डिजिटल बँकिंगचा वापर मात्र कुठे आणि कसाही करता येणार आहे.