Bank Holidays In January 2024: आत्ताच्या घडीला आपण वर्ष 2023च्या शेवटच्या टप्प्यात आहोत, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण वर्षभरात काय करणार आहोत याचे नियोजन करून ठेवतो, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये To Do List असं म्हटलं जातं. आज आम्ही देखील नियोजनात तुमची खास मदत करण्याचा प्रयत्न करू. बँकेची कामं कितीही घरबसल्या करायचं म्हटलं तरीही काही कारणांसाठी बँकेची पायरी चढावीच लागते. डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा हा पूर्णपणे ख्रिसमस साजरा करण्यात निघून जाईल आणि परिणामी अनेक कामं अडकून पडतील. स्वाभाविकपणे यानंतर तुम्ही जानेवारी महिन्याचा विचार कराल. म्हणूनच आम्ही तुम्हाला जानेवारी महिन्यात येणाऱ्या बँकाच्या सुट्टांबद्दल माहिती देणार आहोत. या माहितीचा वापर करून तुम्ही नियोजन करताना बँकेच्या कामांची आखणी सुद्धा व्यवस्थितपणे करू शकता.
जानेवारीत ‘या’ दिवशी असणार बँका बंद: (Bank Holidays In January 2024)
लक्ष्यात घ्या कि जानेवारी महिन्यात बँका एकूण 16 दिवस बंद (Bank Holidays In January 2024) राहणार आहेत. यांमध्ये सर्व शनिवार आणि रविवरांचाही समावेश होतो हे विसरून चालणार नाही. ऑनलाईन बँकिंगची सुविधा उपलब्ध असली तरीही अनेक गोष्टींसाठी बँकेची पायरी चढावी लागतेच म्हणून हातात नियोजनाची यादी असलेली कधीही सोयीस्कर असते. जानेवारी महिन्यात सर्वात आधी मकरसंक्रांत, प्रजासत्ताकदिन असे विशेष दिवस साजरे केले जातील ज्यामुळे देशभरातील बँका बंद असतील आणि इतर दिवशी सरकारी सुट्यांमुळे बँका बंद ठेवल्या जाणार आहेत.
लक्ष्यात घ्या कि बँकांना देण्यात आलेल्या सुट्ट्या या दोन प्रकारच्या असतात, एक ज्या देशभरात संपूर्ण बँकांना लागू होतात तर दुसऱ्या प्रकारच्या सुट्ट्या राज्ज्यांनुसार बदलत असतात. त्यामुळे तुमच्या राज्यांच्यानुसार बँकांना सुट्ट्या कधी आहे हे जाणून घेऊन नंतरच कामाचे नियोजन करा. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सुट्यांच्या यादी 1881 च्या राज्य सरकार, केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश कायद्यांतर्गत येतात. नॅशनल बँकांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सुट्ट्यांमध्ये 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबर यांचा समावेश होतो.
जानेवारी 2024 मध्ये बँका ‘या’ दिवशी बंद राहतील:
1 जानेवारी – नवीन वर्षाचा दिवस
7 जानेवारी – रविवार
11 जानेवारी – मिशनरी डे (मिझोरममध्ये बँका बंद असतील)
12 जानेवारी– स्वामी विवेकानंद जयंती (पश्चिम बंगाल मधील बँका बंद असतील)
13 जानेवारी – दुसरा शनिवार
14 जानेवारी रविवार
15 जानेवारी – पोंगल/थिरुवल्लुवर दिवस (तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश मध्ये बँका बंद असतील)
16 जानेवारी – तुसू पूजा (पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बँका बंद असतील)
17 जानेवारी – गुरु गोविंद सिंग जयंती
21 जानेवारी – रविवार
23 जानेवारी – नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
25 जानेवारी – राज्य दिन (हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद असतील)
26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन
27 जानेवारी – चौथा शनिवार
28 जानेवारी – (रविवार)
31 जानेवारी – मी-डॅम-मी-फी (आसाममध्ये बँका बंद असतील)