बिझनेसनामा ऑनलाईन । आज 20 जून असून जुलै महिना सूरु व्हायला अवघे 10 दिवस बाकी आहेत. त्यापूर्वीच भारतीय रिजर्व बँकेने जुलै महिन्यात बँका किती दिवस बंद असतील (Bank Holidays in July 2023) याची यादी जाहीर केली आहे. जुलै महिन्यात 5-10 दिवस नव्हे तर तब्बल 15 दिवस बँकांना सुट्ट्या आहेत. यामध्ये शनिवार- रविवारच्या सुट्यांचाही समावेश आहे. त्यामुळे बँकेत तुमची काही कामे पेंडिंग असतील तर लवकरात लवकर ती उरकून घ्या.
रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार, जुलै महिन्यामध्ये सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आणि बँकेच्या नियमाप्रमाणे रविवारी बँका बंद ठेवणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर काही प्रादेशिक सुट्या सुद्धा आहेत जे त्या त्या सुट्यांनुसार राज्य सरकार ठरवतील. जुलै महिन्यामध्ये एकूण 5 रविवार आणि 2 शनिवार अशा 7 आणि याव्यतिरिक्त बाकी 8 अशा एकूण 15 दिवस बँका बंद राहणार (Bank Holidays in July 2023) आहेत.
‘या’ दिवशी बँका बंद – (Bank Holidays in July 2023)
2 जुलै- रविवार
5 जुलै- गुरु हरगोविंद सिंह जयंती (जम्मू, श्रीनगर )
6 जुलै- एमएचआयपी दिवस (मिझोरम)
8 जुलै- दुसरा शनिवार
9 जुलै- रविवार
11 जुलै- केर पूजा (त्रिपुरा)
13 जुलै – भानू जयंती (सिक्कीम)
16 जुलै- रविवार
17 जुलै- यु तिरोट सिंग डे (मेघालय)
21 जुलै- द्रुक्पा त्शे – ज़ी (गँगटोक)
22 जुलै- चौथा शनिवार
23 जुलै- रविवार
29 जुलै- मोहरम ( सर्व राज्यात )
30 जुलै- रविवार
31 जुलै- शहादत दिवस ( हरियाणा आणि पंजाब )