Bank Holidays: या दोन दिवसांत बँक मध्ये जाण्याचा विचार करत आहात का? तुमची महत्त्वाची कामे अडकून पडली आहेत का? पण त्याआधी ही बातमी सविस्तर वाचूनच घ्या. कारण मकर संक्रांतीच्या आधी काही दिवस देशातील विविध भागांमध्ये बँका बंद असणार आहेत. गुरुवारपासूनच अनेक राज्यांमध्ये बँकांना पाच दिवसांच्या सुट्टी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या जवळपास असलेली बँक बंद तर असणार नाही ना? याचे खात्री करून घ्या. सोमवारी देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे, आणि म्हणूनच काही बँकाना सुट्टी देण्यात आली आहे. आजचा शनिवार हा महिन्याचा दुसरा शनिवार असल्यामुळे बँकांसाठी ही अधिकृत सुट्टी असते. त्यामुळे शनिवार, रविवार आणि मकर संक्रांत असे सलग तीन दिवस बँका बंद असण्याची दाट शक्यता आहे. 16 आणि 17 तारखेला विविध राज्यांमध्ये काही सण आणि उत्सव साजरे केले जातील, म्हणून त्या भागातील बँकांना सुट्टी देण्यात येणार आहे. देशातील बँका सलग पाच दिवस बंद असू शकतात, म्हणूनच तुमची कामं पूर्ण करण्यासाठी आधी बँकच्या सुट्ट्याबाबतची ही यादी नीट तपासून घ्या.
सलग 5 दिवस असणार का बँका बंद? (Bank Holidays)
बँक ही एक अशी संस्था आहे ज्यावर ग्राहक अधिकाधिक अवलंबून असतात. आपण कितीही ऑनलाईन टेक्नॉलॉजीचा वापर करून आर्थिक व्यवहार करण्याचा निर्णय घेतला तरीही, काही विशेष कामांसाठी बँकच्या अधिकाऱ्यांची भेट घ्यावीच लागते. जर का काही कारणास्तव बँक मधील तुमची काम अडकून पडलेली असतील तर, आता तुम्हाला निदान तीन दिवस वाट बघणं भाग असणार आहे. खाली दिलेली ही यादी तपासून घेत पुढे तुम्ही आर्थिक व्यवहारांचा नियोजन योग्यरित्या करू शकता त्यामुळे जाणून घेऊया की नेमक्या कोणत्या दिवशी देशातील बँका बंद असतील. बँका जरी बंद असल्या तरी एकमेकांना पैसे पाठवण्यासाठी यूपीआय (UPI) चा वापर केला जाऊ शकतो आणि आपत्कालीन प्रसंग ओढवल्यास एटीएम (ATM) चा वापर करून पैशांचे रक्कम विड्रॉव्ह करता येते, त्यामुळे या कामांसाठी तुम्हाला बँकवर निर्भर राहण्याची गरज नाही.
बँकच्या सुट्ट्यांची यादी:
13 जानेवारी 2024- दुसरा शनिवार
14 जानेवारी 2024- रविवार
15 जानेवारी 2024- पोंगल/थिरुवल्लुवर दिवस/मकर संक्रांती/माघ बिहूमुळे बेंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी आणि हैदराबादमध्ये बँका बंद(Bank Holidays) राहणार आहेत.
16 जानेवारी 2024- तिरुवल्लुवर दिनानिमित्त चेन्नईतील बँकांना सुट्टी असेल.
17 जानेवारी 2024- उझावर थिरुनलमुळे चेन्नईमध्ये बँका बंद राहणार आहेत.
21 जानेवारी 2024- रविवार
22 जानेवारी 2024- इंफाळमध्ये बँकांना सुट्टी असेल.
23 जानेवारी 2024- इंफाळमध्ये बँकेला सुट्टी असेल.
25 जानेवारी 2024- थाई पोशम/हजरत मोहम्मद अली यांच्या वाढदिवसानिमित्त चेन्नई, कानपूर आणि लखनऊ येथील बँकांना सुट्टी असेल.
26 जानेवारी 2024- प्रजासत्ताकदिनामुळे देशभरात बँका बंद राहतील.
27 जानेवारी 2024- चौथा शनिवार
28 जानेवारी 2024- रविवार