Bank Holidays: फेब्रुवारी संपत आला आहे आणि मार्च महिना लवकरच सुरू होतोय. मार्च महिन्यात अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात, ज्यामुळे बँका 14 दिवस बंद राहणार आहेत. जर तुमचे बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम असेल तर ते या महिन्याच्या उर्वरित दिवसांत पूर्ण करा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मार्च महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. या यादीनुसार, मार्चमध्ये जवळपास अर्धा महिना बँका बंद राहणार आहेत. जर तुम्हाला मार्च महिन्यात बँकेशी संबंधित कामे करायची असतील तर, RBIच्या अधिकृत वेबसाइटवर (https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx) जाऊन सुट्ट्यांची यादी नक्की तपासा.
मार्च महिन्यात “या” दिवशी बंद असतील बँका: (Bank Holidays)
- 1 मार्च: मिझोराम राज्यात चापचूर कुट
- 3 मार्च: रविवार
- 8 मार्च: महाशिवरात्री
- 9 मार्च: दुसरा शनिवार
- 10 मार्च: रविवार
- 12 मार्च: होळी (महाराष्ट्र)
- 17 मार्च: रविवार
- 22 मार्च: चौथा शनिवार
- 24 मार्च: रविवार
- 25 मार्च: होळी (उत्तर भारत)
- 29 मार्च: राम नवमी, गुड फ्रायडे
- 31 मार्च: रविवार
या सुट्ट्या व्यतिरिक्त, राज्यानुसार स्थानिक सणांमुळेही बँका बंद राहू शकतात. बँकेत जाण्यापूर्वी, कृपया बँकेच्या वेबसाइटला भेट देऊन किंवा बँकेशी संपर्क साधून त्या दिवशी बँक खुली आहे का ते तपासा आणि जर तुम्हाला मार्च महिन्यात बँकेत काही महत्त्वाचे काम असतीलच तर ती लवकर पूर्ण करा, शेवटी ATM नेहमीच तुमच्या मदतीसाठी खुली असणार आहेत (Bank Holidays) त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही.