Bank Holidays In November : नोव्हेंबर महिन्यात इतका दिवस बँका बंद; पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bank Holidays In November: आता आपण सणांच्या काळात जगात आहोत त्यामुळे देशातील बँका अनेक दिवस बंद राहतील, त्यामुळे तुमची महत्वाची कामं वेळेत पूर्ण करून घेणं महत्वाचं आहे. आता नेट बँकिंगची सोय उपलब्ध असली तरीही काही वेळा बँकेत जाण्याची गरज असते आणि एकदा का वेळ निघून गेली तर मोठे नुकसान सोसावे लागू शकते त्यामुळे वेळेतच काळजी घेऊन आपली कामं पूर्ण करून टाका. आज आम्ही तुम्हाला रिझर्व बँक कडून देशातील बँकांना दिलेल्या नोव्हेंबर महिन्यातील सुट्याबदल सांगणार आहोत.

रिझर्व बँकने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात बँका 15 दिवसांसाठी बंद राहतील. यामध्ये दिवाळी, गोवर्धन पूजा , छठ पूजा इत्यादी सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे आणि शिवाय काही शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही (Bank Holidays In November) यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या महिन्यात तुमची अत्यंत महत्वाची असलेल्या कामांची यादी तयार करा आणि वेळेत बँकेत जाऊन पूर्ण करून घ्या

नोव्हेंबर महिन्यात खालील तारखेला बँकांना सुट्टी – (Bank Holidays In November)

1 नोव्हेंबर 2023 कन्नड राज्योत्सवामुळे बेंगळुरू, इंफाळ आणि शिमला येथील बँका बंद राहतील.

10 नोव्हेंबर 2023 गोवर्धन पूजन, लक्ष्मी पूजन आणि दिवाळीनिमित्त बँका बंद राहतील.

13 नोव्हेंबर 2023 लक्ष्मी पूजन आणि दिवाळीमुळे आगरतळा, डेहराडून, गंगटोक, इंफाळ, जयपूर, कानपूर, लखनौ येथील बँका बंद असतील.

14 नोव्हेंबर 2023 अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, गंगटोक, मुंबई, नागपूर येथील बँकां बंद असतील.

15 नोव्हेंबर 2023 भाऊबीज आणि चित्रगुप्त जयंती निमित गंगटोक, इंफाळ, कानपूर, कोलकाता, लखनौ आणि शिमला येथील बँका बंद राहतील.

20 नोव्हेंबर 2023 पाटणा आणि रांचीमध्ये बँका बंद राहतील. (Bank Holidays In November)

23 नोव्हेंबर 2023 देहरादून आणि शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.

27 नोव्हेंबर 2023 गुरु नानक जयंती आणि कार्तिक पौर्णिमेमुळे अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंफाळ, कोची, पणजी, पाटणा, त्रिवेंद्रम आणि शिलाँग सोडून बाकी सर्व बँकांना सुट्टी आहे.

30 नोव्हेंबर 2023 कनकदास जयंतीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.

हे दिवस वगळता रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी देशातील बँका बंद राहतील.