Bank Holidays In October 2023 : ऑक्टोबर महिन्यात ‘इतक्या’ दिवस बँकाना सुट्ट्या; RBI ने जाहीर केली यादी

Bank Holidays In October 2023 : सप्टेंबर महिना आता काही दिवसांतच संपणार आहे. त्यामुळे सर्व महत्वाची आर्थिक कामं संपवावी लागतील. तसेच येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात बँकांना तब्बल १६ दिवस सुट्टी असणार आहे. हा महिना तसा सणासुदींचा असल्यामुळे काही दिवस बँका बंद राहणे साहजिक आहे. आज जाणून घेऊया हे कोणते दिवस आहेत, जेणेकरून आपल्या कामाचं योग्य नियोजन करता येईल.

रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) कडून ऑक्टोबर महिन्याच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holidays In October 2023) समोर आली आहे. ज्यानुसार देशातील बँकांना तब्बल सोळा दिवस सुट्टी असणार आहे. महाराष्ट्रातील बँका ९ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे या सुट्ट्याबद्दल जाणून घेत आपल्या महत्वाच्या कामांचा आराखडा तयार करा. तसेच महत्तवाची काही कामे असली तरी या सुट्ट्या लक्षात ठेवूनच बँकेत जावा.

महाराष्ट्रातील सुट्ट्यांची यादी खालीलप्रमाणे आहे: Bank Holidays In October 2023

1 ऑक्टोबर- रविवार
2 ऑक्टोबर – गांधी जयंती
8 ऑक्टोबर -रविवार
14 ऑक्टोबर -दुसरा शनिवार
15 ऑक्टोबर – रविवार
22 ऑक्टोबर -रविवार
24 ऑक्टोबर – दसरा
28 ऑक्टोबर – चौथा शनिवार
29 ऑक्टोबर – रविवार

दरम्यान, आजकाल अनेक कामं ऑनलाईन करणं सोपं झालं आहे. पैसे पाठवणे, खात्याची रक्कम तपासणे, बिल भरणे इत्यादी दैनंदिन गोष्टी घरात बसल्या करतात. यांसाठी बँकमध्ये जाण्याची गरज नाही. पण अगदीच महत्वाच्या गोष्टी ज्यांसाठी बँकमध्ये गेल्याशिवाय पर्याय नसतो अश्यांसाठी या सुट्ट्या लक्षात घेणं महत्वाचं आहे. या सुट्ट्या राज्यांनुसार बदलू शकतात त्यामुळे आपल्या राज्यांत बँका कधी बंद असतील याची चौकशी करा.