बिझनेसनामा ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, जून महिन्यात बँका १२ दिवस बंद राहतील. यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवारचा समावेश आहे. आरबीआयने नुकत्याच २००० रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णय घेतला असून ३० सप्टेंबर पर्यंत बँकेत नोटा बदलता येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोणत्या दिवशी बँका बंद आहेत हे तुम्ही चेक करा.
जून महिन्यात ‘या’ तारखेला बँकांना सुट्टी –
4 जून 2023: रविवारमुळे बँका बंद राहतील.
10 जून 2023: दुसऱ्या शनिवारमुळे बँका बंद राहतील.
11 जून 2023: रविवारी सर्व बँका बंद राहतील.
15 जून 2023: ओडिशा आणि मिझोराम आणि ओडिशामध्ये राजा संक्रांतीच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
18 जून 2023: रविवारमुळे बँका बंद राहतील.
20 जून 2023: ओडिशात रथयात्रेमुळे बँका बंद राहतील.
24 जून 2023: चौथ्या शनिवारी सर्व बँका बंद राहतील.
25 जून 2023: बँकांना रविवारी सुट्टी आहे.
26 जून 2023: त्रिपुरामध्ये खार्ची पूजेमुळे बँका बंद राहतील.
28 जून 2023: केरळ, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरमध्ये ईद उल अजहा निमित्त बँका बंद राहतील.
29 जून 2023: ईद उल अजहा निमित्त बँका बंद राहतील.
30 जून 2023: मिझोराम आणि ओडिशामध्ये रिमा ईद उल अजहा मुळे बँका बंद राहतील.
बँका बंद राहिल्यानंतरही ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही. सुट्टीच्या दिवशीही लोक आपली सर्व कामे ऑनलाइन बँकिंगच्या मदतीने करू शकतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही तुम्ही घरी बसून बँकिंगची अनेक कामे करू शकता.