Bank Loan : देशातील ‘या’ 3 बड्या बँकांची कर्जे महागली; तुमच्या EMI वर काय परिणाम होणार?

Bank Loan छोटा किंवा मोठा बिझनेस सुरू करण्यासाठी बरेच जण बँकेकडून लोन घेत असतात. त्याचबरोबर आजकाल लोक महागड्या वस्तू किंवा गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेतून लोन घेत असतात. बऱ्याच बँकेकडून या लोन वर वेगवेगळ्या ऑफर देण्यात येत असतात. जेणेकरून ऑफर्स चा ग्राहकांना मिळू शकेल. परंतु आता देशातील प्रमुख बँकांनी कर्जाच्या किमती वाढवल्या आहे. पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय, बँक ऑफ इंडिया ने होम लोन (Bank Loan) सह वेगवेगळ्या प्रकारचे लोन आता महाग केले आहे. यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसू शकतो. या बँकानी मार्जिनल कॉस्टिंग ऑफ फंड बेस्ट लँडिंग रेट म्हणजेच MCLR मध्ये 0.05 टक्के वाढ केली आहे. हा MCLR दर वाढल्यामुळे त्याचा थेट परिणाम तुमच्या EMI वर पडू शकतो.

ICICI BANK –

बँकेच्या वेबसाईट नुसार, आयसीआयसीआय बँकेने एक महिन्याचा MCLR दर 8.35 टक्क्यांवरून 0.05 टक्के वाढवला असून आता हा दर 8.40 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर तीन महिन्यासाठी हा MCLR दर 8.45% एवढा करण्यात आला असून सहा महिन्यांसाठी 8.80 टक्के करण्यात आला आहे. या सोबतच एक वर्षासाठी आता हा MCLR दर 8.85 टक्क्यावरून 8.90 टक्के केला आहे.

Bank Of India-

बँक ऑफ इंडिया ने निवडक मुदतींच्या लोन वर MCLR दर वाढवला असून रात्रीच्या लोन साठी MCLR 7.95% करण्यात आला आहे. बँकेने एका महिन्यासाठी हा दर 8.15 टक्के केला आहे.त्याचबरोबर तीन महिन्यांसाठी हा MCLR दर 8.30% तर सहा महिन्यासाठी हा दर 8.50% करण्यात आला आहे. यासोबतच एका वर्षासाठी हा दर 8.70% तर तीन वर्षासाठी 8.90% निश्चित केला आहे.

PNB – (Bank Loan)

पंजाब नॅशनल बँकेने रात्रीच्या लोन साठी MCLR 8.10 टक्क्यांनी कमी केला आहे. त्याचबरोबर या बँकेने एका महिन्यासाठी MCLR आपण 20 टक्के ठेवला असून 3 महिन्यांसाठी MCLR 8.30% केला आहे. आणि सहा महिन्यासाठी हा MCLR 8.50% ठेवण्यात आला आहे. यासोबतच बँकेने एका वर्षासाठी MCLR 8.60 टक्के तर तीन वर्षांसाठी 8.90% केला आहे.

हा MCLR म्हणजे आरबीआयकडून लागू करण्यात आलेला बेंच मार्क आहे. या MCLR च्या माध्यमातून व्याजदर निश्चित करत असतात. आणि रेपो रेट म्हणजे ज्याच्या माध्यमातून बँकांना स्वस्तात कर्ज मिळू शकतं. जर रेपो रेट कमी असेल तर बँक MCLR मध्ये कपात करून कर्जाचा EMI कमी करतात. पण रेपो रेट वाढला तर बँकांनाही आरबीआय कडून कर्ज महाग मिळते. त्यामुळे MCLR वाढतो.