Bank Locker New Rule : बँक लॉकरच्या नव्या नियमांबद्दल तुम्हांला माहितेय का? वेळीच जाणून घ्या

Bank Locker New Rule : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारकडून काही नियमांमध्ये विशेष बदल करण्यात आले असून यांमधील सर्वात महत्वाचा बदल हा बँक लॉकर्सबद्दल असणार आहे. एक जानेवारी 2023 पासून बँक लॉकर्सच्या नियमांमध्ये होणाऱ्या बदलांची दखल प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे. नवीन बदलांबद्दल अद्याप तुम्ही माहिती मिळवलेली नसेल तर आजच हि बातमी सविस्तर वाचा, कारण आता आवश्यक बदल न केल्यास तुम्हाला बँक लॉकरच्या सुविधेचा लाभ मिळवता येणार नाही. काही दिवसांपूर्वीच लॉकर नूतनीकरण प्रक्रिया 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देशातील सर्व बँकांना देण्यात आले होते आणि यासाठी लॉकर धारकाने नवीन लॉकर करारावर सही करणे अनिवार्य होते. उद्या वर्षाच्या शेवटची तारीख म्हणजेच 31 डिसेंबर आहे आणि त्यानंतर हा नवीन करार नियम म्हणून देशभरात लागू होईल.

काय आहे बँक लॉकरच्या बाबतीतला नवीन नियम? (Bank Locker New Rule)

वाढती गुन्हेगारी लक्षात घेता अनेक लोकं घरात पैसे ठेवणे सोयीचा मानत नाहीत. बँकच्या लॉकर मध्ये पैसे तसेच दागिने सुरक्षित राहतात अशी त्यांना खात्री असल्यामुळे कित्येक जणं आपली ठेव सुरक्षित राहण्यासाठी बँकचा लॉकरचा वापर करतात. आपली ठेव सुरक्षित राहण्यासाठी कोणत्या बँकची निवड करावी हे पूर्णपणे ग्राहकांवर अवलंबून असते मात्र या बँक लॉकर्सवर कोणते नियम लागू होतील हे ठरवण्याची जबाबदारी केवळ रिझर्व बँकच्या हातात आहे. देशातील सर्वोच्च बँक म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया ही नेहमीच आपल्या ग्राहकांचे हित चिंतत असते. ग्राहकांनी बँकवर दाखवलेला विश्वास कायम राहण्यासाठी बँक कडून त्यांना योग्य ती सुरक्षितता कायम मिळत राहिली पाहिजे, हेच उदिष्ठ साध्य करण्यासाठी सध्या रिझर्व बँकने लॉकरच्या बाबतीत काही नियम बदलले आहेत(Bank Locker New Rule).

नवीन नियमानुसार जर का एखाद्या व्यक्तीने त्यांच्या लॉकरमध्ये ठेवलेले सामान खराब झाले तर त्याची नुकसान भरपाई जबाबदार बँकेला द्यावी लागेल. समजा ग्राहकाकडून बँकच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तूला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचली तर आता त्यासाठी बँकला जबाबदार ठरवले जाईल आणि त्यानंतर बँकला संबंधित ग्राहकाला लॉकरवर आकारण्यात येणाऱ्या भाड्याच्या शंभर पट अधिक रक्कम भरपाई म्हणून द्यावी लागणार आहे (Bank Locker New Rule). एवढेच नाही तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये उद्भवलेल्या नुकसानीला देखील आता बँकांना जबाबदार धरले जाईल. उदाहरणार्थ, जर का एखाद्या बँक मध्ये दरोडा पडला आणि पैशांची लुटालूट झाली तर लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंची नुकसान भरपाई त्याच बँकेला भरून द्यावी लागणार आहे.

नवीन नियमानुसार ग्राहकांनी काय करणे अपेक्षित आहे?

सर्वोच्च बँकेकडून ग्राहकांच्या हितासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाचा तुम्हाला पुरेपूर फायदा करून घ्यायचा असेल तर त्यासाठी 31 डिसेंबर पूर्वी बँक लॉकर करारावर तुमची सही असणे महत्वाचे आहे. सही करण्याची अंतिम तारीख बँकने कैक दिवस आधीच जाहीर केल्यामुळे आता त्यात कोणत्याही सवलती देण्यात येणार नाहीत (Bank Locker New Rule). नवीन वर्षात ग्राहकांचा अधिकाधिक विश्वास संपादन करण्यासाठी तसेच त्यांना सर्वाधिक सुरक्षित सेवा प्रदान करण्यासाठी रिझर्व बँक कडून हा निर्णय घेण्यात आला आहे.