Bank of Baroda E-Auction : आता स्वस्तात खरेदी करा प्रॉपर्टी; ही बँक करतेय घरांचा लिलाव

Bank of Baroda E-Auction : सणासुदीच्या काळात घर विकत घेणं हे आपलं स्वप्नच असत, या शुभ दिवसांत घेतलेली घरं जास्ती लाभदायक ठरतात अशी एक मनाची संकल्पना असते. मात्र आताची वाढती महागाई पाहता अशी खरेदी करण काही सोपी गोष्ट नाही. नवीन कोऱ्या घरांच्या किमती आता एक कोटी रुपयांचा पल्ला सहजपणे गाठतात, एवढी रक्कम भरून घर विकत घेणं हे काही सर्वसामान्य माणसाला सहज शक्य अशी गोष्ट नाही. मग आपण काय करतो तर एखादी बँक काही योजना किंवा सवलत देऊ करत आहे का याची वाट पाहतो, आज अशीच एक आनंदाची बातमी आम्ही तुम्हाला देतोय. बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी देत आहे, नेमकं काय हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊयात.

बँक ऑफ बडोदाची नवीन ऑफर –

यंदा सणांच्या काळात जास्ती विचार करायची गरज नाही, कारण तुम्ही जर का बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर बँक तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आली आहे. जिचा वापर करून तुम्ही नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. X म्हणजेच ट्वीटरच्या माध्यमातून हि माहिती बँकने दिली आहे, बँक एका ऑनलाईन लिलावामध्ये काही मालमत्ता स्वस्तात विकायच्या विचारात आहे. तुम्हाला जर का स्वस्तात एखाद घर विकत घ्यायचं असेल तर अशी संधी परत मिळणार नाही. या लिलावामध्ये जमिनींपासून घरांपर्यंत सर्वच गोष्टी सामावलेल्या आहेत, त्यामुळे तुमच्या गरज आणि इच्छेनुसार इथे बोली लावली जाऊ शकते.

BOB E auction

कधी होणार लिलाव – Bank of Baroda E-Auction

हा लिलाव बँक कडून 30 ऑक्टोबर 2023 रोजी सुरु करण्यात येणार असून हा लिलाव ऑनलाईन माध्यमातून (Bank of Baroda E-Auction) केला जाईल. एखाद्या माणसाकडून जर का कर्जाची परतफेड आली नाही तर तारण म्हणून ठेवलेली वस्तू बँक हस्तगत करते. याच वस्तूंचा नंतर लिलाव करून बँक आपले पैसे परत मिळवत असते. जर तुम्हालाही या ई-लिलावात सहभागी होऊन प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर www.bankofbaroda.in/e-auction/e-auction-notices या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. या लिंकवर तुम्हाला लिलावाशी संबंधित सर्व माहिती मिळेल.