Bank Of Baroda Re KYC : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना खुशखबर; बँकेने सुरु केली नवी सुविधा

बिझनेसनामा ऑनलाईन । आज-काल डिजिटल बँकिंगची सुविधा सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे बँकेत जाऊन पैसे चेक करण्यापासून पैसे काढण्यापर्यंतचे सर्व कामे मोबाईल मध्ये होतात. गुगल पे, फोन पे यासारख्या प्लॅटफॉर्म वरून आपण पैसे ट्रान्सफर करतो. परंतु KYC करण्यासाठी आपल्याला बँकेत जावे लागते. परंतु जर तुम्ही बँक ऑफ बडोदा मध्ये खाते ओपन केलेले असेल तर तुम्हाला केवायसी साठी बँकेत जाण्याची गरज नाही. आता बँक ऑफ बडोदा ने ग्राहकांसाठी व्हिडिओ री केवायसी (Bank Of Baroda Re KYC) सुविधा लॉन्च केली आहे. त्यामुळे आता केवायसी देखील ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या होऊ शकते.

बँक ऑफ बडोदाने केवायसी साठी ग्राहकांना बँकेत चकरा माराव्या लागू नये यासाठी ग्राहकांच्या सुविधांसाठी व्हिडिओ रि केवायसी सुविधा लॉन्च केली आहे. ही एक डिजिटल पद्धत असून नेट बँकिंगच्या माध्यमातून देखील केवायसी करता येऊ शकते. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सहजपणे केवायसी होऊ शकते. बँक ऑफ बडोदाने मंगळवारी ही सुविधा सुरू केली असून यामुळे ग्राहकांची विनाकारण धावपळ होणार नाही. घरी बसल्या बसल्या ते व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून केवायसी करू शकतील.

व्हिडिओ KYC करण्यासाठी हे कागदपत्र गरजेचे

बँक ऑफ बडोदा मध्ये व्हिडिओ रे केवायसी (Bank Of Baroda Re KYC) सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त हवे. याशिवाय तुम्ही भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे. रि केवायसी करत असताना तुम्हाला आधार कार्ड नंबर आणि पॅन कार्ड नंबर असणे गरजेचे आहे. यासोबतच ग्राहकांची केवायसी अपडेट झाल्यानंतर केवायसी कागदपत्र लगेच अपडेट करणे गरजेचे आहे.

या वेळेत उपलब्ध होईल व्हिडिओ रिकेवायसी सुविधा– (Bank Of Baroda Re KYC)

आरबीआयने सर्व बँकांतील ग्राहकांना केवायसी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार व्हिडिओ रिकेवायसीच्या माध्यमातून तुम्ही तुमची प्रोसेस पूर्ण करू शकतात. व्हिडिओ री केवायसी सुविधा सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तू राहणार आहे. तुमचे केवायसी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर लगेचच ग्राहक तपशील बँक रेकॉर्डमध्ये अपडेट केले जाईल. त्यानंतर ग्राहकांना कन्फर्मेशन मेसेज उपलब्ध होईल.

अशा पद्धतीने करा व्हिडिओ रि- केवायसी

1) बँक ऑफ बडोदा च्या अधिकारी वेबसाईटवर जा.
2) त्यानंतर तुम्हाला बेसिक माहिती विचारली जाईल, ती भरा
3) त्यानंतर व्हिडिओ री केवायसी साठी तुम्ही अर्ज करू शकतात.
4) ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर बँक एक्झिक्युटिव्ह सोबत व्हिडिओ केवायसी कॉल केली जाईल.
5) त्यानंतर व्हिडिओ कॉलवेळी ग्राहकांकडे ग्राहकांचे पॅन कार्ड, पांढरा कागद आणि निळा किंवा काळा पण आवश्यक आहे.