Bank Overdraft Facility : अरे व्वा!! बँक खाते रिकामे असले तरी पैसे काढता येणार; कसे ते पहा

बिझनेसनामा ऑनलाईन । पैश्यांची गरज आहे, पण खाते रिकामे असल्यामुळे चिंतीत आहात का? तर आता चिंता करण्याची मुळीच गरज नाही. बँकेजवळ अशी एक सुविधा उपलब्ध आहे जिच्या मदतीने तुम्ही बँकमध्ये पैसे नसताना सुद्धा व्यवहार करू शकता. हि सुविधा आहे ओव्हर ड्राफ्टची (Bank Overdraft Facility). तर काय आहे ओव्हर ड्राफ्ट? आणि बँकमध्ये पैसे नसताना देखील कसा कराल व्यवहार हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा..

Bank Overdraft Facility म्हणजे काय?

ओव्हर ड्राफ्ट फेसिलीटी (Bank Overdraft Facility) हे एक प्रकारचे कर्ज आहे. ज्यामध्ये बँका आपल्या ग्राहकांना खात्यात असलेल्या पैश्यांपेक्षा जास्ती रक्कम देऊ करतात. इथे ही गोष्ट लक्षात घ्या की कर्ज आणि ओव्हर ड्राफ्ट या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओव्हर ड्राफ्ट मध्ये व्याजाची गणना दररोज केली जाते. ओव्हर ड्राफ्टच्या सुविधा जरी मदत करणारी असली तरी देखील इथे तुम्हाला घेतलेल्या रक्कमेवर जास्ती व्याज द्यावे लागते व तुम्हाला किती रक्कम देऊ करायची हे बँक ठरवत असते.

Bank Overdraft Facility किती प्रकारच्या आहेत?

बँक आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यानद्वारे ओव्हर ड्राफ्टच्या सुविधा (Bank Overdraft Facility) दिल्या जातात.या सुविधेचे दोन प्रकारांमध्ये विभाजन केलेले आहे, जसे की सुरक्षित ओव्हर ड्राफ्ट आणि असुरक्षित ओव्हार ड्राफ्ट होय. सुरक्षित ओव्हर ड्राफ्ट मध्ये बँक काही तरी गोष्ट तारण म्हणून घेत असते. जसे कि FD,घर , गाडी इत्यादी. पण जर का तुमच्याजवळ तारण म्हणून ठेवण्यासाठी काहीच नसेल तर मिळणाऱ्या रकमेला असुरक्षित ओव्हर ड्राफ्ट असं म्हटलं जातं. असुरक्षित ओव्हर ड्राफ्ट मध्ये क्रेडीट कार्डचा वापर करून पैसे काढू शकता. काही बँका पूर्वमान्य आधारावर हे कर्ज देतात, तर इतर ठिकाणी अर्ज करावा लागतो. हा अर्ज online करता येतो, आणि दरम्यान बँक काही रक्कम फी म्हणून आकारते.