Bank Saving For Children’s : मुलांच्या नावे बँकमध्ये गुंतवणूक करायची असेल तर असं बनवा FD आणि RD

Bank Saving For Children’s : प्रत्येक आई-वडिलांची अशी इच्छा असते कि त्यांच्या मुलाचं भविष्य उज्वल आणि सुरक्षित असावं. जगभरातली महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि अश्यात जर का टिकाव लागायचा असेल तर स्वस्थितीत गुंतवणूक गरजेची असते. मुलाचं शिक्षण, नोकरी, लग्न यांसारखे महत्वाचे टप्पे पार करण्यासाठी भरपूर पैश्यांची गरज असते. आणि वेळोवेळी या दृष्टीने पालक गुंतवणूक करत असतात, तुमच्याही आजूबाजूला असे अनेक पालक असतील पण म्हणून गोंधळून जाऊ नका. आज आम्ही तुम्हाला FD आणि RD तयार करण्याची सोपी पद्धत सुचवणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित बनवू शकता..

मुलांच्या नावे गुंतवणूक कुठे करावी? (Bank Saving For Children’s)

बँकमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात, रिकरिंग डेपोजिट (RD) आणि फिक्स्ड डेपोजिट (FD). मुलांच्या बाबतीत सुद्धा हेच नियम लागू होतात. इथून मिळणारा परतावा मुलांचे भविष्य उज्वल बनवण्यासाठी मदत करतो. तुम्ही ज्या बँकचे ग्राहक आहात त्याच बँकमध्ये मुलांच्या नावे नवीन खात तयार करावं कारण बालवयात असलेल्या खातेधाराला काही नियमांचे पालन करावं लागतं. तसेच KYC नियमांचे पालन करण बंधनकारक आहे. मुख्य खातेधारक बाल वयात असल्यामुळे त्याचे पालक यासाठी सर्वस्वी जबाबदार ठरतात. बँक मुलांच्या नावे खात उघडण्यासाठी दोन प्रकारचे पर्याय देतात, ज्यात 10 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना स्वतःचं खात सांभाळायची मुभा दिली जाते आणि 10 वर्षांपेक्षा कामी वयाच्या मुलांच्या बँक खात्यासाठी पालक जबाबदार असतात.

यासाठी महत्वाचे दस्तावेज कोणते?

कुठलंही बँक खात उघडताना पॅन कार्ड सर्वात महत्वाचा दस्तावेज असतो, पण वयाच्या बंधनामुळे इथे याची गरज नाही. पॅन कार्डशिवाय FD किंवा RD तयार केली जाऊ शकते. प्रत्येक बँका या त्यांच्या गरजेनुसार कागदपत्रांची मागणी करतात त्यामुळे बँकच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन महत्वाची कागदपत्रे कोणती यांची माहिती मिळवा. पण मुलांचे आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड सर्वाधिक महत्वाचे असल्यामुळे देशातील कोणतीही बँक याशिवाय तुम्हाला खात (Bank Saving For Children’s) उघडू देणार नाही.