Bank Strike In India: देशातील सर्व बँका 13 दिवस संपावर जाणार; काय आहे कारण?

Bank Strike In India : बँकेत काही काम अजून कामं अडकून पडलंय का? हो तर हि बातमी नीट वाचा आणि त्यानंतर तुमची महत्वाची कामं उरकून टाका कारण बँकचे कर्मचारी डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 मध्ये एकूण 13 दिवस संपावर जाणार आहेत (Bank Strike In India). हि बातमी भरपूर महत्वाची आहे त्यामुळे याकडे नक्कीच दुर्लक्ष करू नका. ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशनकडून हि बातमी जारी करण्यात आली. आता बँक नेमकी एवढ्या दिवसांच्या संपावर का जातेय? आणि नेमक्या किती बँकांचा यात समावेश आहे? असे अनेक प्रश तुमच्या मनात उपस्थित झाले असतील, त्यामुळे नक्की वाचा कारण या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आम्ही देणार आहोत…

का करणार देशातील बँका संप? (Bank Strike In India)

देशातील बँकांच्या काही मागण्या पूर्ण न झाल्यामुळे हा मोठा संप होणार आहे. यातली सर्वात पहिली मागणी म्हणजे संपावर उतरलेल्या सर्व बँकांना पुरेशी स्टाफ दिला जावा. दुसऱ्या मागणीत बँका म्हणतात कि कायमस्वरूपी त्यांच्या नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग बंद करण्यात यावे. तिसऱ्या आणि शेवटच्या मागणीत बँकांनी असे म्हटले आहे कि आउटसोर्सिंगशी संबंधित सेटलमेंटमधील तरतुदी आणि त्याचे उल्लंघन लवकरात लवकर थांबवले जावे.

नेमक्या कोणत्या बँका संपावर जाणार आहेत?

ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशनच्या माहितीनुसार डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यांमध्ये विविध बँकांचा संप असणार आहे. आज दोन्ही महिन्यांमध्ये असणारा बँकांचा संप क्रमशः जाणून घेऊया:

डिसेंबर:

१) 4 डिसेंबर – PNB, SBI आणि पंजाब अँड सिंध बँक

२) 5 डिसेंबर- बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया

३) 6 डिसेंबर- कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया

४) 7 डिसेंबर- इंडियन बँक आणि युको बँक

५) 8 डिसेंबर- युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रा

६) 11 डिसेंबर- खासगी बँका बंद असतील

जानेवारी महिन्यात या बँका बंद राहतील:

१) 2 जानेवारी- तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पोन्डेचरी, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप.

२) 3 जानेवारी- गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादर, दमण आणि दीव.

३) 4 जानेवारी- राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड.

४) 5 जानेवारी- दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश.

५) 6 जानेवारी- पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम.

६) 19 आणि 20 जानेवारी- या दोन तारखांना देशभरातील सर्व बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.