Bank Working Days : तुम्हाला माहिती आहे का देशातील सर्व बँकांनी सरकारकडे एक मागणी केली आहे, या मागणीत त्यांनी दर महिन्यातील शनिवारी सुट्टी द्यावी अशी इच्छा सरकार समोर व्यक्त केली आहे. केंत्रीय अर्थ मंत्रायालाकडून आलेल्या माहितीनुसार देशातील बँका शनिवारच्या सुट्टीची मागणी करत आहेत. याचच आर्थ असा की या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर भारतात बँका केवळ 5 दिवसांसाठी कामकाज सांभाळतील भागवत कराड (राज्य) वित्त मंत्री यांनी संसदेत चालेलेल्या चर्चेत हा प्रस्ताव IBA कडून मांडण्यात आला असल्याची माहिती दिली. आता खरोखरच जर का सरकार आणि अर्थ मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली तर केवळ 5 दिवसांत आपल्याला बँकेची कामं आटोपून घ्यावी लागतील, माध्यमांना मिळालेली अधिक माहिती काय सांगते जाणून घेऊया…
देशात बँका केवळ 5 दिवस काम करणार?(Bank Working Days)
देशभरात आत्तापर्यंत सर्व बँकांना महिन्यातल्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी दिली जात आहे, तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांप्रमाणे महिन्यातील प्रत्येक रविवार हा बँकांसाठी सुट्टीचा दिवस असतो. देशातील सर्व बँकांना वर्ष 2015 पासून हा नियम लागू केला गेला आहे. मात्र या दिलेल्या सुट्टीमुळे बँका संतुष्ट नसून त्यांनी दर महिन्याला शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस सुट्टी देण्याची मागणी केली आहे (Bank Holidays). IBA च्या अंतर्गत पब्लिक सेक्टर, प्रायवेट सेक्टर, विदेशी बँका, ग्रामीण बँका तसेच अखिल भारतीय आर्थिक संस्थांचा समावेश होतो. तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये सध्या 1.5 मिलियन कर्मचारी काम करतात.
यावर सरकारचे म्हणणे काय?
बँकांनी केलेली मागणी हि साधी सोपी वाटत असली तरी देखील त्यामुळे देशातील अनेकांची कामं अडकून पडू शकतात, तांत्रिक बदल झाल्यामुळे बँकेची अनेक कामं घर बसल्या पूर्ण होऊ शकतात पण तरी देखील व्यवसाय किंवा इतर महत्वाच्या कामांच्या निगडीत बँकांना भेट (Bank Working Days) द्यावीच लागते. सरकारकडून अद्याप यावर कोणताही निर्णय दिलेला नाही (Bank Holidays), पण तज्ञांच्या अनुसार जर का सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली तर बँकाच्या कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातील कामाचे तास वाढवले जाण्याची शक्यात आहे. त्यांच्या कामामध्ये 40 मिनिटांची वाढ केली जाऊ शकते, त्यामुळे हा निर्णय सत्यात उतरला तर बँका सकाळी 9:45 ते संध्याकळी 5:30 पर्यंत काम करतील.