BCCI SBI Partnership : भारतीय क्रिकेट बोर्ड BCCI ने स्टेट बँक ऑफ इंडियाची विमा कंपनी SBI Life ला देशाअंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दर्ज्यावर होणाऱ्या लढतींसाठी आपला अधिकृत भागीदार (BCCI-SBI Partnership) म्हणून नियुक्त केलं आहे. या करारांतर्गत BCCI आणि SBI Life तीन वर्षांसाठी म्हणजेच 2023 ते 2026 पर्यंत सोबत काम करणार आहेत.
हि भागीदारी (BCCI SBI Partnership) 22 सप्टेंबर पासून मोहाली इथे खेलेल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत या वनडे सामन्यांच्या मालिकेपासून सुरु झाली. या कराराचा BCCI ला मोठा आर्थिक फायदा होणार आहे, कारण SBI Life हि देशातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणून ओळखली जाते. SBI Life कडून BCCIला प्रत्येक सामन्यासाठी 85 लाख रुपये दिले जातील. या करारानंतर BCC Iकडून हल्लीच विश्व चषकासाठी भारताची जर्सी लॉंच करण्यात आली आहे.
असा आहे एकूण करार (BCCI SBI Partnership)
SBI Life सोबतचा करार BCCI ने 20 सप्टेंबर रोजी जाहीर केला होता. या तीन वर्षांच्या करारामध्ये एकूण 56 सामने खेळले जातील. अश्याप्रकारे BCCIला 47.6 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. BCCIचे सचिव जय शहा या करारामुळे भरपूर खुश आहेत, व आनंदाने त्यांनी SBI Life चे भागीदार म्हणून स्वागत केले आहे. तसेच BCCI चे चेअरमन रॉजर बिन्नी यांनी देखील आनंद व्यक्त करत भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी अश्या मजबूत भागीदारीसाठी आम्ही उत्सुक आहोत असे म्हंटल आहे.