Beer Bar Licence : व्यवसाय हा कोणत्याही प्रकारचा असू शकतो, छोटा किंवा मोठा व्यवसाय असला तरीही तो व्यावसायिकाला किती प्रमाणात फायदा मिळवून देऊ शकतोय हे महत्वाचं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्यवसायाची निवाड करू शकता. तुम्हाला ज्या क्षेत्रात व्यवसाय करण्याची सर्वाधिक इच्छा आहे त्याचीच निवड करा. आजकाल व्यवसाय सुरु करण्याचं भरपूर वारं वाहतंय आणि बऱ्याच लोकांच्या मनात अशी एक संकल्पना रूढ होतेय कि व्यवसायातून भरपूर नफा कमावता येतो. हो! हि गोष्ट काही एकदम चुकीची नाही. तुम्ही व्यवसाय करून भरपूर पैसे कमावू शकता पण त्यासाठी तुम्हाला तेवढीच मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी दाखवावी लागेल. तुमच्याशी स्पर्धा करणारे बाजारात अनेक प्रतिस्पर्धी असतील, त्यांच्याशी टिकाव धरून राहण्यासाठी नवनवीन गोष्टींचा अवलंब करावा लागेल. आज आम्ही तुम्हाला एका नवीन व्यवयसायच्या प्रकाराबद्दल माहिती देणार आहोत. या व्यवसायात अनेक लोकं स्वतःचं नशीब अजमावत आहेत, त्यामुळे तुम्ही देखील याचा नक्कीच विचार करावा…
दारूच्या व्यवसायातून कमवा भरपूर पैसे:
यशस्वी व्यवसाय तोच जो गुंतवणूकदाराला गुंतवणुकीच्या दुप्पट नफा कमावून देऊ शकतो. दारूच्या व्यवसायाला दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे. आताच्या घडीला अनेक क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांची उपलब्धताही म्हणेल तशी नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही व्यवसायाकडे वळत भरपूर कमाई करू शकता. इथे काम सुरु करण्याचा अजून एक फायदा म्हणजे तुम्हाला कुणाच्या हाताखाली काम करण्याची गरज असणार नाही तर तुम्ही स्वतः या व्यवसायाचे मालक असाल. दारूचा व्यवसाय हा 50 टक्के नफा कमावून देणारा आहे, खास करून जर का पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी हा व्यवसाय सुरु केलात तर नक्कीच यातून फायदा मिळेल. मात्र लक्ष्यात असुद्या कि दारूचा व्यवसाय सुरु करण्यासाठी एका खास परवान्याची (Beer Bar Licence) गरज असते. आता हा परवाना कसा मिळवावा हे सविस्तर जाणून घेऊया.
सध्या बीअर बारचा व्यवसाय हा ट्रेंड मध्ये आहे याचं प्रमुख कारण म्हणजे नवीन वर्ष आणि नाताळचं सेलेब्रेशन. लग्न समारंभ असो किंवा एखादी पार्टी, बिअर शिवाय अनेकवेळा ती पूर्ण होत नाही. नवखा मुलगाही दारू पिण्याआधी बिअर प्यायला सुरुवात करतो. त्यामुळे बिअर शॉपीच्या बाहेर आपल्याला सतत गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे एक चांगली आणो मोक्याची जागा बघून तुम्ही बिअर बार सुरु करू शकता. यासोबत तुम्हाला काही कामगार आणि दारू साठवून ठेवण्यासाठी फ्रिजची गरज पडेल. तुमचा व्यवसाय नेमका किती मोठा आहे यानुसार त्यावर येणारा खर्च अवलंबून ठरतो त्यामुळे अंदाजे हा व्यवसाय सुरु करण्यासाठी 15 ते 20 लाख रुपयांची गरज पडू शकते.
बिअर शॉपी सुरु करण्यासाठी परवाना महत्वाचा: Beer Bar Licence
आपल्या देशात आजही दारूवर बंदी आहे. मात्र ज्या राज्यांमधलं सरकार दारूची खरेदी विक्री मान्य करतं अश्या ठिकाणी परवाना काढत नक्कीच तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. मात्र लक्ष्यात ठेवा विना परवाना जर का तुम्ही व्यवसाय सुरु करण्याची चूक केलीत तर सरकारच्या नजरेत तो गुन्हा ठरेल आणि तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे बिअर शॉपी सुरु करण्याआधी परवाना काढा. त्यासाठी तुम्हाला एक्सईझ खात्याकडे अर्ज भरावा लागतो. यावर कोर्टचा स्टॅम्प असणे अनिवार्य आहे. यानंतर ऑनलाईन प्रणालीचा वापर करून एक फॉर्म भरावा लागतो, इथे विचारलेली संपूर्ण माहिती दिल्यानंतर तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे सोबत जोडावी लागतील. शेवटी या सर्व कागदपत्रांना एकत्र करत सोबत एक पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवा आणि हा अर्ज जवळच्या ऑफिसमध्ये समाविष्ठ करा. यानंतर अधिकारी तुम्ही दिलेली माहिती नीट तपासून पाहतील आणि ती योग्य असल्यास सरकारकडून तुमच्यासाठी बिअर शॉपी सुरु करण्याचा परवाना जारी केला जाईल.