बिझनेसनामा । अनेक लोकांचे उत्पन्न टॅक्सच्या कक्षेत येत नाही. म्हणूनच त्यांना असे वाटते की, आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज नाही. ज्यामुळे जरी आपण ITR दाखल केला तरी आपल्याला कोणताही लाभ मिळणार नाही. मात्र, ITR दाखल करून कोणताही फायदा होणार नाही हे त्यांचे मत चुकीचे आहे.
कारण आपले उत्पन्न टॅक्स भरण्याच्या कक्षेत येत नसले तरीही ITR फाइल करणे अनेक बाबींसाठी महत्वाचे ठरेल. ITR चा फायदा फक्त लोन घेताना किंवा कोणत्याही देशाचा व्हिसा घेतानाच मिळत नाही तर इतर अनेक कामांमध्येही त्याचा खूप उपयोग होतो. चला तर मग आज आपण ITR भरण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात-
TDS रिफंडसाठी आवश्यक
आपले उत्पन्न इन्कम टॅक्सच्या कक्षेत येत नसले तरीही TDS कापला जातो. अशा परिस्थितीत, जेव्हा आपण ITR दाखल करतो तेव्हाच रिफंड मिळेल. TDS दाखल केल्यानंतरच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून हे मूल्यांकन केले जाते की, आपण कर दायित्वामध्ये बसत नाही. जर आपल्याला रिफंड दिला जाणार असेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून त्यावर प्रक्रिया करून तो आपल्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाईल.
बँकेकडून कर्ज मिळवणे सोपे होईल
बँका आणि इतर कर्ज देणाऱ्या संस्था ITR रिसीटलाच सर्वात विश्वासार्ह उत्पन्नाचा पुरावा मानतात. यामुळे जर आपण ITR भरत असाल आणि भविष्यात कार, लोन किंवा होम लोन सारखे एखादे लोन घेणार असाल तर ITR द्वारे ते मिळवण्यात खूप मदत होईल.
व्हिसा मिळवणे सोपे होईल
हे लक्षात घ्या कि, अनेक देशांकडून व्हिसा देताना लोकांकडे त्यांच्या उत्पन्नाचा पुरावा विचारला जातो. आपली ITR रिसीट हा आपल्या उत्पन्नाचा ठोस पुरावा आहे. तसेच ITR रिसीटद्वारे आपण जाऊ इच्छित असलेल्या देशांच्या अधिकाऱ्यांना आपल्या उत्पन्नाची कल्पना येण्यास आणि आपण आपला प्रवास खर्च पूर्ण करण्यास सक्षम असल्याची खात्री करण्यास मदत होते.
लॉस सेट ऑफ करण्यासाठी उपयुक्त
शेअर्स किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठीही ITR खूप महत्वाचा ठरेल. कारण जर आपल्याला नुकसान झाले तर हा तोटा पुढील वर्षासाठी पुढे नेणे आणि इनकम टॅक्स रिटर्न भरणे आवश्यक आहे. तसेच पुढील वर्षात कॅपिटल गेन झाल्यास हा तोटा नफ्याच्या तुलनेत एडजस्ट केला जाईल आणि यामुळे आपल्याला टॅक्स सूटचा फायदा मिळू मिळेल.