बिझनेसनामा । सध्या जागतिक बाजारात मंडी सदृश वातावरण आहे. ज्यामुळे गेले काही शेअर बाजारात सतत चढ-उतार होत आहेत. मात्र, असे असूनही काही म्युच्युअल फंडांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहेत. म्युच्युअल फंडामध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणुक करून गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवता येतो. यामध्ये एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये पैसे गुंतवता येतात. म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक पूर्ण पारदर्शी असते. यामध्ये फंड हाउसेसच्या मॅनेजरकडून आपले पैसे वेगवेगळ्या स्टॉकमध्ये गुंतवले जातात. तसेच कोणत्या स्टॉकमध्ये आपले किती पैसे गुंतवले जात आहेत याची देखील संपूर्ण माहिती आपल्याला ऑनलाइन मिळवता येते.
हे लक्षात घ्या कि, नवीन गुंतवणूकदारांसाठी SIP खूपच फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला आपल्या सोयीनुसार आणि बजट नुसार पैसे गुंतवता येतात. यामध्ये आपल्याला हप्त्यांमध्ये देखील पैसे गुंतवता येतात. आपल्याला 100 रुपयांद्वारे देखील एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरु करता येते. याचा आणखी एक फायदा असा कि, यामध्ये गुंतवणूकदाराला एकरकमी रक्कम जमा करावी लागत नाही.
SIP करण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणुक करून चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळवता येतो. एसआयपीमध्ये आपल्याला म्युच्युअल फंडामध्ये फक्त 100 रुपयांद्वारे गुंतवणूक सुरू करता येते. याच्या मदतीने आपल्याला कमी गुंतवणुकीने दीर्घकाळामध्ये मोठा फंड जमा करता येईल. ज्या गुंतवणूकदाराला जास्त जोखीम घ्यायची नाही त्याच्या एसआयपी मध्ये गुंतवणूक करणे हा योग्य पर्याय ठरेल.
एसआयपीच्या मदतीने कोणत्याही व्यक्तीला म्युच्युअल फंडामध्ये नियमितपणे गुंतवणूक करता येईल. तसेच यामधील गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेची देखील गरज नाही. तसेच बाजारातील हालचाल पाहून आपल्याला यामध्ये गुंतवणूक वाढवता देखील येईल किंवा कमी करता येईल. त्याच वेळी ज्या लोकांकडे शेअर बाजाराचे अगदी थोडेसे ज्ञान आहे, त्यांच्यासाठी देखील SIP हा एक चांगला पर्याय ठरू शकेल.