Bengaluru Airport : एखादं काम आपण बिनचूक किंवा चोख कारण म्हणजे इतरांच्या नजरेत आपली किंमत वाढायला मदत होते. लोकं आपल्या कामावर विश्वास ठेवतात, केलेल्या चोख कामाबद्दल प्रशंसा करतात. पण हि गोष्ट केवळ माणसांपुर्ती मर्यादित आहे का? नक्कीच नाही. एखादी कंपनी चांगल्यातली चांगली सेवा देते किंवा एखादं ठिकाण सगळ्यांकडून प्रशंसनीय मानलं जातं, अशीच बातमी आज समोर आली आहे बेंगलोरच्या विमानतळाबद्दल. बेंगलोर येथील Kempegowda International Airport हे जगातील सर्वात पंक्चुअल विमानतळ ठरलं आहे. का बेंगलोरमधील विमानतळाची एवढी प्रशंसा केली जात आहे पाहूयात…
Kempegowda International Airport ची चर्चा का? Bengaluru Airport
आपल्या देशातील अनेक सुंदर विमानतळांपैकी एक म्हणजे कर्नाटकातील प्रसिध्द केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. बेंगलोरच्या सुंदर शहरात हे विमानतळ (Bengaluru Airport) एकदम खुलून दिसतं. त्यांचा भव्य परिसर शहराची ख्याती सांगतो. काही किलोमीटर आधीच सुरु होणारा परिसर अनेकांची मनं जिंकून घेण्यासाठी पुरेसा आहे. हल्लीच केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला पन्कचुअल विमानतळ म्हणून स्थान मिळालं आहे. एविएशन एनालेटीक्सच्या अहवालातून हि बातमी समोर आली आहे.
एविएशन एनालेटीक्स असा बनवतो अहवाल:
एविएशन एनालेटीक्स नियोजित वेळेच्या 15 मिनिटांच्या आत सुटणाऱ्या विमानांचे रेन्किंग करते. यामध्ये जगभरातील विमान सेवांचा समावेश होतो. आपल्या देशातील केम्पेगौडा अंतराष्ट्रीय विमानतळानंतर यात अमेरिकेतील सॉल्ट लेक सिटी हे विमानतळ दुसऱ्या स्थानावर आहे. भारतासाठी अजून एक आनंदाची बातमी म्हणजे केम्पेगौडा (Kempegowda International Airport) शिवाय यात हैद्राबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश झाला आहे. केम्पेगौडा विमानतळाने जुलै महिन्यात 87.51%, ऑगस्ट महिन्यात 89.66% आणि सप्टेंबर महिन्यात 88.51% प्रवाशांसाठी वेळेवर प्रस्थान करण्याचा रेकोर्ड कायम ठेवला आहे.