Bharat Atta : सरकार स्वस्तात विकणार गव्हाचे पीठ; कुठे आणि कसं मिळणार?

Bharat Atta: देशातली महागाई काही केल्या कमी होण्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाही. आधी टोमॅटो आणि आता कांदा असे करत सगळ्याच आवश्यक वस्तू महाग होत चालल्या आहेत, सरकारकडून वेळोवेळी यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला जातो तरीही यावर काही केल्या हवा तसा परिणाम दिसून येत नाही. आता यावर उपाय आणि महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार पुन्हा एकदा आपल्या मदतीसाठी धावून आलं आहे.

यंदा ज्या अनेक वस्तूंच्या भावांनी आकाश गाठलंय त्यात गव्हाचाही समावेश होतो. गहू हा आपल्या जगण्यातला महत्वाचा भाग आहे कारण पोळी किंवा चपाती शिवाय आपलं जेवणाचं ताट अपूर्ण आहे. आपण मध्यम वर्गीय माणसं असल्यामुळे अश्या गोष्टी आपल्या पाकिटावर नक्कीच मोठा परिणाम करत असतात. आता सध्या गव्हाच्या पिठाचा भाव 35 रुपये किलो आहे तर ब्रेडसाठी लागणाऱ्या पिठाची किंमत 40-50 वर येऊन पोहोचली आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने गव्हाच्या पीठाचा वाढता दर पाहून स्वस्तात गव्हाचे पीठ (Bharat Atta) विकण्याचा निर्णय घेतला आहे. स्वस्त गव्हाच्या पीठाची विक्री या महिन्याच्या 7 तारखेपासून होणार आहे.

आता गहू मिळणार स्वस्तात? Bharat Atta

आता सरकारी गव्हाच्या पीठाची विक्री ‘भारत ब्रॅंड’ (Bharat Atta) अंतर्गत होणार आहे. ज्याचा दर 27.50 असा निश्चित केला जाईल. याबद्दल सध्या तरी अजून विचार सुरु आहेत पण संदर्भात जबाबदारी राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघावर सोपवली जाऊ शकते. या योजनेसाठी भारतीय अन्न महामंडळ ( FCI ) अडीच लाख टन गव्हाचा पुरवठा करणार आहे व या गव्हाचे पीठ केल्यानंतर ते 10 आणि 30 किलोमध्ये पॅकींग करून त्याची विक्री केली जाणार आहे.

केंद्र सरकारकडून या पीठाचे वितरण भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ नाफेड, राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ, केंद्रीय भांडार आणि सफल यांच्या विक्री केंद्रांमधून केली जाऊ शकते. या योजनेतून स्वस्त गव्हाचे पीठ राज्य सरकारना त्यांच्या कल्याणकारी योजना, पोलिस, कारागृहांतर्गत पुरवले जाणार आहे. तसेच इतर सहकारी संस्थामार्फत आणि महामंडळामार्फत गव्हाच्या पीठाची विक्री केली जाऊ शकते.