Bharat Gaurav Train : सध्या सर्वत्र राम मंदिर आणि अयोध्या या विषयांची जोरदार चर्चा सुरु आहे. 22 तारखेला मंदिरात होणाऱ्या श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून अनेकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. कदाचित तुम्हाला माहिती असेल की या सोहळ्यासाठी Air India Express आणि Indigo या विमान कंपन्यांनी अयोध्येसाठी खास विमानसेवेची आखणी केली आहे, मात्र केवळ विमानानेच नाही तर रेल्वेचा प्रवास करून देखील तुम्ही या भव्य-दिव्य राम मंदिराचे दृष्टीनं घेऊ शकणार आहात, कारण आज IRCTC ने राम भक्तांसाठी एक खास बातमी जाहीर केली आहे, समोर आलेल्या माहितीनुसार लवकरच IRCTC कडून भारत गौरव डीलक्स एसी टूरिस्ट ट्रेन(Bharat Gaurav Deluxe AC Train) द्वारे भक्तांना अयोध्येचा खास टूर पॅकेज दिले जाईल. केवळ एवढेच नाही तर या खास पॅकेजचा वापर करून तुम्ही अयोध्येसोबत प्रयागराज आणि तीन जोतिर्लिंगांना भेट देऊ शकणार आहात. काय आहे IRCTC ची खास ऑफर जाणून घेऊया..
IRCTC ची ‘अशी’ असेल खास ऑफर : (Bharat Gaurav Train)
वरती नमूद केल्याप्रमाणे IRCTC च्या या खास ऑफर अंतर्गत रामजन्मभूमी म्हणजेच अयोध्येसोबत प्रयागराज आणि तीन ज्योतिर्लिंगांना भेट देण्याची संधी दिली जाणार आहे, म्हणूनच या टूर पॅकेजला Shree Ram Janam Bhoomi – Ayodhya, Prayagraj with 03 Jyotirlinga Darshan असे नाव दिले आहे. अयोध्येतील सोहळ्यानंतर म्हणजेच 5 फेब्रुवारी 2024 पासून या पॅकेजला गुजरातमधल्या राजकोट मधून हिरवा झेंडा दाखवला जाईल. दरम्यान इच्छुक प्रवासी राजकोट, सुरेंद्र नगर, वीरमगाम, साबरमती, नडियाद, आनंद, छायापुरी, गोधरा, दाहोद, मेघनगर आणि रतलाम रेल्वे स्थानकांवरून प्रवासाची सुरुवात करू शकतील.
प्रत्येक भाविक तसेच पर्यटकाला अधिकाधिक प्रसिद्ध धार्मिक ठिकाणांना भेट देण्याची हि सर्वोत्तम संधी ठरेल, कारण IRCTC च्या या खास प्लॅनमध्ये तुम्हाला अयोध्या, प्रयागराज, श्रृंगवेरपुर, चित्रकूट, वाराणसी, उज्जैन आणि नाशिकमधल्या धार्मिक स्थळांना भेट देण्याची सर्वोत्कृष्ट संधी मिळणार आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला IRCTC Economy AC (20,500 रुपये), 3 AC Comfort Class (33,000 रुपये), 2 AC Superior (46,000 रुपये) प्रति व्यक्ती अश्या तिन्ही विभागांमध्ये परवडणाऱ्या दरांमध्ये प्रवास करण्याची संधी देणार आहे(Bharat Gaurav Train). एकूणच 10 दिवस 9 रात्रींसाठी आखण्यात आलेले या टूर पॅकेजमध्ये प्रवाश्यांना ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरची सोया उपलब्ध करून दिली जाईल, तसेच सर्वांची सोय Non-AC हॉटेल रूममध्ये केली जाणार आहे.